तुमच्यासोबत कधी असे झाले आहे का? तुम्ही बँकेत लोनसाठी अर्ज केला, तुम्हाला खात्री होती की तुमचा पगार चांगला आहे, पण तरीही तुमचे लोन रिजेक्ट झाले, तुम्हाला कळत नाही की आपले लोन रिजेक्ट का झाले. असे होण्यामागे एकच कारण असू शकते, ते म्हणजे तुमचा CIBIL Score.
पूर्वी बँका फक्त तुमचा पगार किंवा उत्पन्न पाहून लोन देत असत, पण आता परिस्थिती बदलली आहे. तुम्हाला घर घ्यायचे असेल, गाडी घ्यायची असेल किंवा कोणतेही लोन घ्यायचे असेल, तर बँका सर्वात आधी तुमचा CIBIL स्कोर पाहतात.
म्हणूनच या लेखात आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. CIBIL Score म्हणजे काय, तो कसा तयार होतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो कसा वाढवायचा.
CIBIL Score म्हणजे काय?
CIBIL म्हणजे Credit Information Bureau (India) Limited ही भारतातील एक कंपनी आहे, जी लोकांच्या लोन आणि क्रेडिट कार्ड वापराची माहिती जमा करते आणि त्यावर आधारित CIBIL Score तयार करते.
CIBIL Score हा 300 ते 900 दरम्यानचा एक तीन अंकी नंबर असतो, हा स्कोर बँकेला सांगतो की तुम्ही पैशांबाबत किती जबाबदार आहात. आणखी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तुम्ही घेतलेले कर्ज किंवा क्रेडिट कार्ड वेळेवर परत करता की नाही यावरून बँक तुमच्यावर किती विश्वास ठेवते, त्यालाच CIBIL Score म्हणतात.
CIBIL Score कसा तयार होतो?
बऱ्याच लोकांना वाटते की CIBIL स्कोर एकाच गोष्टीवर ठरतो, पण प्रत्यक्षात तसे नाही, तर अनेक वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतो. बँका आणि क्रेडिट ब्युरो तुमच्या आर्थिक वागणुकीचा अभ्यास करून हा स्कोर तयार करतात.
CIBIL Score कसा तयार होतो?
सोप्या भाषेत: तुमचा CIBIL Score हा तुमच्या आर्थिक सवयींवर (Financial Habits) आधारित असतो.
- Payment History: EMI आणि bills वेळेवर भरले का?
- Credit Usage: Credit card किती वापरता?
- Credit History: किती वर्षांपासून credit वापरत आहात?
- Credit Mix: वेगवेगळ्या प्रकारचे loan आहेत का?
- Loan Applications: किती वेळा loan साठी apply करता?
लक्षात ठेवा: चांगल्या सवयी ठेवल्या तर score वाढतो आणि चुकीच्या सवयींमुळे score कमी होतो
चांगला CIBIL Score किती असावा?
हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकालाच पडतो. साधारणत: 750+ किंवा त्यापेक्षा जास्त स्कोअर चांगला मानला जातो.
- 750+ स्कोर असेल तर बँक तुमच्यावर विश्वास ठेवते.
- Loan मिळणे सोपे जाते.
- कमी व्याजदर मिळण्याची शक्यता वाढते.
आपण एका उदाहरणाने समजून घेऊयात.
अमित आणि रोहन हे दोघे लोनसाठी एका बँकेकडे अर्ज करतात.
अमितचा score = 780
रोहनचा score = 620
अशा वेळी अमितला लोन पटकन आणि कमी व्याजदरात मिळेल, कारण अमितचा स्कोर हा 750+ आहे. मात्र रोहनचा स्कोर 750+ च्या खाली असल्यामुळे रोहनला लोन मिळायला अडचण येऊ शकते.
CIBIL Score किती असावा?
| CIBIL Score Range | रेटिंग | याचा अर्थ | Loan मिळण्याची शक्यता |
|---|---|---|---|
| 750 – 900 | 🟢 Excellent | खूप चांगला स्कोअर | खूप जास्त (Easy Approval) |
| 700 – 749 | 🔵 Good | चांगला स्कोअर | जास्त |
| 650 – 699 | 🟡 Average | मध्यम | मर्यादित |
| 550 – 649 | 🟠 Low | कमी स्कोअर | कमी |
| 300 – 549 | 🔴 Poor | खूप खराब | खूप कमी / Reject |
750 पेक्षा जास्त score असेल तर लोन approval chances जास्त असतात.

CIBIL Score कसा check करावा? (Free)
तुम्ही घरबसल्या अगदी सहज मोबाईलवरून CIBIL Score चेक करू शकता.
Step 1- अधिकृत वेबसाइटवर जा
तुम्ही सर्वप्रथम TransUnion CIBIL च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन “Get Your CIBIL Score” किंवा “Check Your Score” या पर्यायावर क्लिक करा.
Step 2- Account तयार करा / Login करा
या वेबसाइटवर अकाऊंट तयार करण्यासाठी तुम्हाला Sign up करावे लागेल. जर तुम्ही आधीच अकाऊंट तयार केलेले असेल, तर तुम्ही थेट Login करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पासवर्ड टाकावा लागतो.
Step 3: तुमची Basic माहिती भरा
पुढे तुम्हाला काही additional माहिती द्यावी लागते, जसे PAN Card/ Aadhar/ Passport/ Voter ID इ. मधील एका ओळखपत्राची माहिती भरावी लागते, त्यानंतर तुमची जन्मतारीख आणि पिन कोड टाकून तुमची ओळख verify करा.
Step 4: OTP Verification करा
दिलेली माहिती पूर्ण भरल्यावर तुमच्या मोबाईल नंबर किंवा ईमेलवर OTP येतो, तो OTP टाकून verification पूर्ण करा.
Step 5: Dashboard वर जाऊन Score पाहा
OTP verify झाल्यावर तुम्ही login करू शकता. Login केल्यावर तुम्हाला Dashboard वर तुमचा CIBIL Score दिसेल.
Credit Report कसा मिळवावा?
जर तुम्हाला तुमचा पूर्ण क्रेडिट रिपोर्ट पाहायचा असेल तर
Step 6: “Credit Report” वर क्लिक करा
Dashboard मध्ये “Credit Report” हा option निवडा.
Step 7: काही प्रश्नांची उत्तरे द्या
तुमची ओळख confirm करण्यासाठी काही प्रश्न विचारले जातील, जसे तुमचे loan details, credit card वापर. दिलेल्या 5 प्रश्नांपैकी किमान 3 प्रश्नांची बरोबर उत्तरे द्यावी लागतात.
Step 8: Report मिळवा
Verification पूर्ण झाल्यावर, तुमचा पूर्ण credit report तयार होतो, तो तुम्हाला ईमेलवर 24 तासांत मिळतो.
CIBIL Score कमी का होतो?
अनेक वेळा लोक नकळत चुका करतात.
- EMI वेळेवर न भरणे
- Credit card bill उशिरा भरणे
- Credit card full वापरणे
- खूप जास्त loan घेणे
- वारंवार loan apply करणे
या चुका टाळणे खूप गरजेचे आहे.
CIBIL Score वाढवण्याचे 7 सोपे मार्ग
1. EMI आणि bills वेळेवर भरा
तुमचा सिबिल score वाढवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही EMI आणि bills वेळेवर भरणे. बँका सर्वात आधी हेच पाहतात की तुम्ही EMI आणि क्रेडिट कार्ड bills वेळेवर भरता का? जर तुम्ही वेळेवर पेमेंट केले, तर तुमचा स्कोर वाढतो, पण जर तुम्ही उशीरा पेमेंट केले, तर तुमचा स्कोर लगेच कमी होतो.
उदाहरण – रमेश दर महिन्याला EMI वेळेवर भरतो, यामुळे त्याचा स्कोर हळूहळू वाढतो. याउलट रमेशचा मित्र सुरेश 2-3 वेळा उशिरा पेमेंट करतो, यामुळे त्याचा स्कोर कमी होतो.
2. Credit card limit चा 30% पेक्षा जास्त वापर करू नका
तुमच्या क्रेडिट कार्ड लिमिटचा 30% पेक्षा कमी वापर करा. तुम्ही जास्त वापर केला, तर बँकेला वाटते तुम्ही पैशांवर अवलंबून आहात, पण जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर मर्यादित केला, तर तुमचा score वाढवण्यास मदत होते.
उदाहरण – जर तुमची क्रेडिट कार्ड मर्यादा ₹10,000 असेल, तर त्याचा 30% म्हणजे ₹3,000 पर्यंतच वापर करणे योग्य राहते.
3. एकाच वेळी अनेक loan apply करू नका
तुम्ही प्रत्येक वेळी लोन किंवा क्रेडिट कार्ड साठी अप्लाय करत असाल, तर तुमच्या report मध्ये hard inquiry अशी नोंद होते, परिणामी तुमचा score कमी होतो. जास्तीत जास्त 1-2 वेळा अप्लाय करणे ठीक आहे, पण त्या पेक्षा जास्त अप्लाय करणे हे तुमच्यासाठी वाईट असू शकते, कारण प्रत्येक application तुमचा score कमी करू शकतो.
4. जुने credit account बंद करू नका
अनेक लोक काहीही विचार न करता आपले जुने क्रेडिट अकाऊंट बंद करतात. तुमची क्रेडिट हिस्टरी जितकी जुनी तितकी चांगली, कारण जुने अकाऊंट विश्वास वाढवते, तुमचा स्कोर इम्प्रूव करते, पण जर तुम्ही जुने अकाऊंट बंद केले, तर तुमची क्रेडिट स्कोर हिस्टरी कमी होते.

5. Small loan घेऊन वेळेवर भरत राहा
जर तुम्ही एखादा छोटा लोन घेतले आणि वेळेवर EMI भरला, यामुळे तुमची क्रेडिट हिस्टरी चांगली तयार तर होतेच, शिवाय score वाढायला ही मदत होते. हा मार्ग अशा व्यक्तीसाठी योग्य आहे ज्याचा स्कोर कमी आहे किंवा हिस्टरी नाही.
6. Credit report check करत राहा
Credit स्कोर नियमित तपासत रहा, कारण कधी कधी तुमच्या रिपोर्ट मध्ये चुकीची माहिती असू शकते, चुकीचा लोन दाखवला जाऊ शकतो, यामुळे तुमचा score कमी होतो. म्हणून वर्षातून किमान 1-2 वेळा रिपोर्ट चेक करत जा. काही चुकीची माहिती असेल, तर ती सुधारता येते.
7. सुरक्षित क्रेडिट कार्ड वापरा (Beginner साठी)
जर तुमच्याकडे क्रेडिट हिस्टरी नसेल, तर हा सर्वात सोपा मार्ग आहे. यामध्ये काय करायचे, बँकत FD करा, त्यावर क्रेडिट कार्ड घ्या, यालाच Secured credit card म्हणतात. हे करण्याचा फायदा म्हणजे यात धोका कमी असतो. FD वर क्रेडिट कार्ड घेऊन स्कोर तयार करू शकता.
Loan साठी CIBIL Score का महत्त्वाचा आहे?
जेव्हा तुम्ही लोन घेण्यासाठी बँकेकडे अर्ज करता, तेव्हा बँका सर्वात आधी तुमचा Score पाहतात.
- तुमचा सिबील स्कोर चांगला असेल, तर लोन मिळण्याची शक्यता जास्त असते.
- तुमचा स्कोर (750+) असेल, तर बँक तुम्हाला कमी व्याजदर देते.
- Score चांगला असेल, तर लोन रक्कम जास्त मंजूर होते.
- तुमचा सिबील स्कोर चांगला असेल, तर तुम्हाला फक्त लोनच नाही, तर क्रेडिट कार्डसाठीसुध्दा हा स्कोर महत्त्वाचा ठरतो.
- तुमचा स्कोर बँकेला हे दर्शवितो की, तुम्ही कर्ज फेडण्यासाठी एक जबाबदार व्यक्ती आहात आणि भविष्यात लोन परत करण्यास पात्र आहात.
- चांगला स्कोर असेल, तर तुमचे लोन नाकारले जाण्याची शक्यता कमी होते.
“CIBIL Score हा तुमच्या personal finance चा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे personal finance म्हणजे काय आणि ते कसे manage करायचे हे जाणून घेणे आवश्यक आहे.”
👉“personal finance म्हणजे काय”
निष्कर्ष
जर तुम्हाला भविष्यात तुम्हाला लोन, क्रेडिट कार्ड किंवा आर्थिक स्थिरता हवी असेल, तर CIBIL Score समजून घेणे खूप गरजेचे आहे, त्यासोबतच तो किती असावा आणि कसा तपासावा हे माहीत असायला हवे. CIBIL Score हा तुमच्या आर्थिक शिस्तीचा रिपोर्ट कार्ड आहे, म्हणून आजपासूनच तुमचा स्कोर सुधारायला सुरुवात करा. जितका स्कोर चांगला, तितके तुमचे आर्थिक भविष्य मजबूत होऊ शकेल.
FAQ (सामान्य लोकांचे प्रश्न)
1. CIBIL Score किती असावा?
750+ best मानला जातो.
2. Low score असेल, तर loan मिळतो का?
मिळू शकतो, पण: interest जास्त असतो, approval कठीण असते.
3. CIBIL Score किती वेळात वाढतो?
साधारण 3 ते 6 महिने लागू शकतात (regular payments केल्यास).
4. Free मध्ये score check करता येतो का?
हो, वर्षातून 1 वेळ free check करता येतो.
5. Credit card नसल्यास score बनतो का?
नाही, credit history नसल्यास score तयार होत नाही.