UPI Scam 2026: QR Code आणि Fake Call Fraud पासून स्वतःला कसे सुरक्षित ठेवाल?

आजकाल जवळपास प्रत्येकजण UPI चा वापर करत आहे. खरेदी छोटी असो वा मोठी, आपण काही सेकंदात Google Pay, PhonePe किंवा Paytm वापरून पेमेन्ट करतो. रोख रक्कम बाळगण्यापेक्षा ऑनलाइन पेमेन्ट करणे सोपे आणि सुलभ झाले आहे.

Table of Contents

ऑनलाइन पेमेन्ट करणे सोपे असले तरी ऑनलाइन स्कॅम दिवसेंदिवस वाढत आहेत. आज अनेक लोक QR Code Scam, Fake Customer Care Fraud, Screen Sharing App Fraud आणि Fake Payment Screenshot यांसारख्या फसवणुकीचे बळी ठरत आहेत. एका चुकीच्या QR Scan मुळे काही सेकंदात बँक अकाऊंट रिकामे होऊ शकते.

म्हणूनच प्रत्येक UPI युजरने या स्कॅमबद्दल माहिती असणे खूप आवश्यक आहे. या लेखामध्ये आपण  UPI Scam म्हणजे काय, Scammers कोणत्या Tricks वापरतात, स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे आणि Fraud झाल्यास त्वरित काय करावे याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

UPI Scam 2026

UPI Scam म्हणजे काय?

UPI Scam म्हणजे ऑनलाइन पद्धतीने लोकांची फसवणूक करून त्यांच्या बँक अकाऊंटमधील पैसे चोरण्याची पद्धत. आज UPI मुळे पैसे पाठवणे आणि घेणे खूप सोपे झाले आहे, पण याच सुविधेचा गैरफायदा Scammers घेत आहेत.

हे Scammers आपल्याला Call, SMS, WhatsApp Message, Fake link, QR code किंवा Mobile App च्या मदतीने Trap करण्याचा प्रयत्न करतात. हे इतक्या विश्वासाने बोलतात की सामान्य व्यक्तीला ते खरे बँक अधिकारी किंवा Customer Care Executive आहेत असे वाटते.

यात ज्येष्ठ नागरिक, ऑनलाइन पेमेन्ट नुकतेच वापरायला सुरुवात केलेले लोक, घाईत व्यवहार करणारे वापरकर्ते, ऑनलाइन व्यवहारांबद्दल पुरेशी माहिती नसलेले सहज या Scammers च्या जाळ्यात अडकू शकतात.

हे Scammers खूप स्मार्ट आणि प्रोफेशनल पद्धतीने काम करतात. समोरच्या व्यक्तीला ओळख सांगताना ते स्वतःला बँक कर्मचारी, ग्राहक सेवा कार्यकारी, पोलीस अधिकारी, डिलिव्हरी एजंट, विद्युत मंडळाचे कर्मचारी, ऑनलाइन शॉपिंग विक्रेता, KYC अपडेट अधिकारी असल्याचे सांगतात आणि आपला विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करतात.

जसे, काही Scammers तुमचे बँक अकाऊंट बंद होणार आहे, KYC अपडेट करा, तुम्हाला बक्षीस किंवा cashback मिळणार असल्याचे सांगतात किंवा तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे पाठवत आहोत असे सांगून आपल्याला घाबरवतात किंवा लालच देतात. त्यानंतर ते आपल्याला

  • OTP विचारतात
  • UPI PIN टाकायला सांगतात
  • QR code scan करायला सांगतात
  • खोटे किंवा संशयास्पद App install करायला सांगतात.
  • अनोळखी link उघडायला सांगतात.

आणि एकदा आपण ही माहिती दिली की अकाऊंटमधून पैसे चोरी होऊ शकतात.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Scammers अनेक वेळा आपल्या भावना आणि घाईचा फायदा घेतात. काही वेळा ते इतक्या शांत आणि विश्वासाने बोलतात की समोरची व्यक्ती विचार न करता त्यांच्या सांगण्याप्रमाणे स्टेप्सचे अनुसरण करतात.

म्हणूनच कोणताही ऑनलाइन व्यवहार करताना अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे आहे, अज्ञात व्यक्तीवर लगेच विश्वास न ठेवणे आणि बँकेची माहिती कोणालाही शेअर न करणे खूप आवश्यक आहे.

 

QR Code Fraud कसा होतो?

QR code scam हा UPI Fraud प्रकारापैकी एक धोकादायक प्रकार मानला जातो. अनेक लोकांना असे वाटते की QR code ने पैसे घेता येतात, याच गैरसमजाचा फायदा Scammers घेतात.

UPI मध्ये QR code चा वापर पेमेन्ट करण्यासाठी केला जातो. जेव्हा तुम्ही QR code scan करून UPI PIN टाकता तेव्हा तुमच्या अकाऊंटमधून समोरच्या व्यक्तीकडे पैसे जातात. पण अनेक Scammers पैसे घेण्यासाठी QR code scan करायला सांगून फसवतात.

ऑनलाइन खरेदी-विक्री प्लॅटफॉर्म वापरताना काळजी घेणे गरजेचे आहे, कारण काही फसवणूक करणारे अशा प्लॅटफॉर्मचा गैरवापर करू शकतात. अनेक Scammers Fake Buyer बनून लोकांशी संपर्क करतात आणि आधी काही पैसे पाठवत असल्याचे सांगून QR code पाठवून फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात.

 

QR Code Scam नेमका कसा होतो?

समजा तुम्ही एखाद्या ऑनलाइन खरेदी विक्री प्लॅटफॉर्मवर जुना मोबाईल विकण्यासाठी जाहिरात टाकली आहे. ती जाहिरात बघून एका व्यक्तीने तुम्हाला कॉल किंवा WhatsApp message केला  आणि तुमचा मोबाईल खरेदी करण्यास तयार असल्याचे सांगितले.

ती व्यक्ती तुमच्याशी खूप विश्वासाने बोलते आणि तुम्हाला असे म्हणते की, ”मी ॲडव्हान्स पेमेंट  पाठवत आहे, तुम्ही फक्त QR code scan करा.” त्यानंतर तो एक QR code पाठवतो.

तुम्हाला पैसे Receive होतील असे समजून तुम्ही

  • QR code scan करता
  • Amount दिसते
  • UPI PIN टाकता

आणि काही सेकंदांत तुमच्या अकाऊंटमधून पैसे कट होतात.

अनेक वेळा Scammer लगेच दुसरा QR code पाठवतो आणि “पहिला transaction fail झाला” असे सांगून तो तुम्हाला पुन्हा स्कॅन करायला सांगतो. तुमचा त्या व्यक्तीवर विश्वास बसल्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा स्कॅन करतात व अशा प्रकारे scammer पुन्हा तुमच्या बँक अकाऊंटमधून पैसे काढून घेतात.

 

लोक या scam मध्ये का अडकतात?

या स्कॅम मध्ये अडकण्याचे मुख्य कारण म्हणजे माहितीचा अभाव आणि घाई.

तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना असे वाटते असेल की,

  •   QR code scan केल्याने पैसे येतात
  •   UPI PIN फक्त verification साठी असतो
  •   समोरचा व्यक्ती खरोखरचा खरेदीदार आहे.

पण प्रत्यक्षात UPI PIN टाकणे म्हणजे व्यवहार मंजूर करणे असा होतो.

 

QR Code Fraud ओळखण्याची चिन्हे

जर कोणी तुम्हाला

  • पैसे Receive करण्यासाठी QR code स्कॅन करायला सांगत असेल
  • घाई करत असेल
  • वारंवार PIN टाकायला सांगत असेल
  • अनोळखी WhatsApp नंबर वरून बोलत असेल
  • “transaction pending” असे सांगून पुन्हा स्कॅन करायला सांगत असेल

म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, QR code scan करून पैसे Receive होत नाहीत.

 

Fake Customer Care Scam म्हणजे काय?

आज ऑनलाइन बँकिंग आणि UPI वापरणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे Fake Customer Care Scam चे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अनेक लोकांना Transaction fail होणे, Refund न मिळणे, Account block होणे किंवा Payment Pending राहणे अशा समस्या येतात. अशावेळी लोक लगेच Google वर ग्राहक सेवा क्रमांक शोधतात आणि याच गोष्टीचा फायदा Scammers घेतात.

असे scammers Google search, social media page, WhatsApp profile किंवा fake website वर खोटे customer care numbers upload करतात. हे नंबर पाहायला अगदी खरे वाटतात, त्यामुळे सामान्य व्यक्ती सहजपणे त्यांच्यावर विश्वास ठेवते.

जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या प्रश्नांच्या समाधानासाठी त्या नंबरवर कॉल करते तेव्हा scammer स्वतःला Bank officer, UPI customer care executive, Google Pay support, PhonePe support किंवा Paytm support म्हणून सांगतो आणि अतिशय professional पद्धतीने बोलतो.

असे scammer सुरुवातीला तुमची समस्या शांतपणे ऐकतो, त्यामुळे त्याच्यावर विश्वास निर्माण होतो. त्यानंतर तो verification किंवा पैसे परत मिळवून देण्याच्या नावाखाली माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो.

Scammer लोक कोणत्या गोष्टी विचारतात?

अनेक वेळा असे scammer:

  • OTP विचारतो
  • UPI PIN विचारतो
  • Debit card details विचारतो
  • Bank account details विचारतो
  • Screen sharing app install करायला सांगतो
  • अनोळखी link उघडायला सांगतात.

आणि एकदा का तुम्ही ही माहिती दिली की खाते ॲक्सेस करून पैसे ट्रान्सफर केले जाऊ  शकतात.

 

Fake Customer Care Scam नेमका कसा होतो?

समजा तुम्ही UPI द्वारे पेमेन्ट केले पण व्यवहार Pending राहिले. तुम्हाला पैसे परत आले नाहीत म्हणून तुम्ही Google वर “PhonePe Customer Care Number” असे सर्च करता.

Search मध्ये दिसणाऱ्या एका नंबरवर तुम्ही कॉल केला मात्र तो scammer चा नंबर निघाला.

तो scammer तुमच्याशी खूप विश्वासाने बोलतो त्यामुळे तुम्हाला त्याच्यावर कोणताही संशय येत नाही. त्यानंतर तो तुमच्याकडे

  • OTP मागतो
  • QR code पाठवतो
  • मोबाईल स्क्रीन पाहता येईल असे app install करायला सांगतो.

आणि काही मिनिटांत तुमच्या अकाऊंटमधून पैसे Transfer होतात. नंतर आपल्याला समजते की तो नंबर official customer care चा नव्हता तर scammer चा होता.

 

लोक या Scam मध्ये का अडकतात?

या scam मध्ये लोक अडकण्याची काही मुख्य कारणे:

  • Transaction fail झाल्यामुळे panic होणे
  • लगेच solution शोधण्याची घाई
  • Google वर दिसणारा नंबर खरा आहे असे वाटणे

फसवणूक करणारे अतिशय विश्वासाने आणि व्यावसायिक पद्धतीने बोलतात. ऑनलाइन व्यवहारांबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे अनेक लोक फसतात.

या scam मध्ये ज्येष्ठ नागरिक आणि online banking नवीन वापरणारे लोक अशा scam मध्ये जास्त अडकतात.

 

Fake Customer Care Scam कसा ओळखावा?

जर समोरची व्यक्ती:

  • OTP विचारत असेल
  • UPI PIN मागत असेल
  • Screen sharing app install करायला सांगत असेल
  • Personal banking माहिती विचारत असेल
  • घाई करत असेल

तर सावध राहणे आवश्यक आहे. कारण कोणतीही bank किंवा official customer care:

  • OTP विचारत नाही
  • UPI PIN विचारत नाही
  • Screen sharing app install करायला सांगत नाही

 

UPI Scam

Screen Sharing App Fraud कसा होतो?

Online fraud मध्ये Screen Sharing App Scam खूप वेगाने वाढत आहे. अनेक लोकांना या apps बद्दल पूर्ण माहिती नसल्यामुळे ते सहजपणे scammers च्या जाळ्यात अडकतात.

Scammers अशा Apps ला टार्गेट करतात जे technical support किंवा office कामासाठी वापरले जातात, या Apps मार्फत काही Fraudsters गैरवापर करून लोकांच्या मोबाईल आणि बँकिंग संबंधित माहितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात.

Screen sharing app म्हणजे असे Application ज्यामुळे दुसरी व्यक्ती तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरचा स्क्रीन पाहू शकते. काही वेळा त्या व्यक्तीला device control करण्याची परवानगी देखील मिळू शकते.

उदाहरणार्थ

  • Mobile screen पाहणे
  • Buttons click करणे
  • App open करणे
  • Messages पाहणे
  • Banking app access करणे

यांसारख्या गोष्टी शक्य होऊ शकतात.

 

हा Scam नेमका कसा होतो?

अनेक वेळा हे Scammer स्वतःला Bank officer, Customer care executive, Cashback support agent, KYC update officer, Electricity board कर्मचारी म्हणून सांगतात.

तो सुरुवातीला एखादी समस्या किंवा offer सांगतो:

  • “तुमचा refund pending आहे”
  • “Cashback मिळणार आहे”
  • “KYC update करावी लागेल”
  • “Bank account verify करायचे आहे”

यानंतर तो तुम्हाला “मी तुम्हाला मदत करतो, फक्त एक app install करा” असे सांगतो.

App install झाल्यानंतर scammer एक कोड किंवा परवानगी मागतो. आणि जर तुम्ही परवानगी दिल्यानंतर scammer ला तुमची मोबाईल स्क्रीन पाहता येते.

यामुळे तुमची माहिती जसे

  • OTP दिसू शकतो
  • Banking app दिसते
  • UPI PIN टाकताना स्क्रीन पाहता येतो

आणि काही परिस्थितीत scammer मोबाईल कंट्रोल देखील करू शकतो.

 

Screen Sharing App Fraud कसा ओळखावा?

जर कोणी तुम्हाला

  • Unknown app install करायला सांगत असेल
  • Remote access मागत असेल
  • Mobile screen share करायला सांगत असेल
  • Banking app open करायला सांगत असेल
  • OTP किंवा PIN टाकायला सांगत असेल

तर सावध राहणे आवश्यक आहे.

 

Fake Payment Screenshot Scam

ऑनलाइन खरेदी विक्री वाढल्यामुळे fake payment screenshot scam चे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यात नेहमी ऑनलाइन वस्तु विकणारे विक्रेते, छोटे व्यवसायाचे मालक आणि सोशल मीडियातून व्यवहार करणारे लोक या scam मध्ये जास्त फसतात.

या मध्ये scammer प्रत्यक्षात पेमेन्ट न करता पेमेन्ट केल्याचा fake screenshot पाठवतो. हा screenshot इतका खरा वाटतो की समोरच्या व्यक्तीकडून पैसे आले आहेत असे समजून वस्तु किंवा सेवा देऊन टाकतात. पण प्रत्यक्षात बँक अकाऊंटमध्ये कोणतेही पैसे आलेले नसतात.

 

हा Scam नेमका कसा होतो?

समजा तुम्ही एखादी वस्तु ऑनलाइन विकत आहात. एका व्यक्तीने तुम्हाला WhatsApp किंवा Instagram वर message केला आणि वस्तु खरेदी करण्याची तयारी दाखवली. त्या व्यक्तीने ऑनलाइन पेमेन्ट केले आणि screenshot check करण्यासाठी पाठवला.

यानंतर तो:

  • Fake payment screenshot पाठवतो
  • UPI successful message दाखवतो
  • Fake bank SMS edit करून पाठवतो

ही माहिती इतकी खरी वाटते की आपण विश्वास ठेवतो आणि आपली वस्तु किंवा सेवा त्या व्यक्तीला पाठवतो. पण काही वेळाने लक्षात येते की अकाऊंट मध्ये पैसे आलेलेच नाहीत.

 

Fake Screenshot कसा तयार केला जातो?

आज अनेक photo editing apps आणि खोटे payment screenshot तयार करणारी tools आज सहज उपलब्ध आहेत. काही scammers:

  • Screenshot edit करतात
  • Amount बदलतात
  • Transaction ID fake तयार करतात
  • Fake “Payment Successful” screen बनवतात

यामुळे screenshot अगदी खरा वाटू शकतो.

Fake Payment Screenshot कसा ओळखावा?

जर screenshot मध्ये:

  • Font वेगळा दिसत असेल
  • Transaction time mismatch असेल
  • SMS format वेगळा वाटत असेल
  • Bank notification आलेली नसेल
  • UPI app history मध्ये transaction दिसत नसेल

अशा वेळी  सावध राहणे आवश्यक आहे.

UPI Scam

 UPI Scam पासून सुरक्षित कसे राहावे?

 UPI Scam पासून सुरक्षित कसे राहावे?

आजकाल online payment वाढल्यामुळे UPI fraud चे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. थोडी काळजी घेतली तर तुम्ही मोठ्या आर्थिक नुकसानीपासून स्वतःचे संरक्षण करू शकता.

  • UPI PIN कोणालाही सांगू नका

कोणतीही bank किंवा UPI app कधीही तुमचा UPI PIN विचारत नाही.

  • Unknown QR Code Scan करू नका

QR code scan करून पैसे receive होत नाहीत. PIN टाकणे म्हणजे payment approve करणे असते.

  • OTP Share करू नका

OTP ही account security ची महत्वाची key असते. ती कोणालाही सांगू नका.

  • Screen Sharing Apps Install करू नका

Unknown व्यक्तीच्या सांगण्यावरून AnyDesk किंवा TeamViewer सारखे apps install करणे धोकादायक असू शकते.

  • Official Customer Care Number वापरा

Customer care number नेहमी bank च्या official website किंवा app मधूनच घ्या.

  • Fake Links वर Click करू नका

WhatsApp किंवा SMS मधील unknown banking links टाळा.

  • Transaction Alert सुरू ठेवा

SMS आणि email alerts सुरू ठेवल्यास fraud transaction लगेच लक्षात येऊ शकतो.

महत्वाची सूचना:
OTP, UPI PIN आणि bank details कोणालाही share करू नका. सावध राहा आणि सुरक्षित digital payment करा.

Fraud झाल्यास त्वरित काय करावे?

 

 UPI Fraud झाल्यास त्वरित काय करावे?

जर तुमच्यासोबत UPI fraud झाला असेल तर घाबरून जाऊ नका.
अनेक वेळा योग्य वेळी action घेतल्यास नुकसान कमी होऊ शकते.
म्हणून fraud लक्षात येताच खालील महत्वाचे steps त्वरित follow करा.


1.  Bank Customer Care ला त्वरित Call करा

सर्वप्रथम तुमच्या bank किंवा UPI app च्या official customer care वर संपर्क करा.
त्यांना fraud transaction बद्दल माहिती द्या आणि:

  • Account temporarily block करण्याची विनंती करा
  • UPI service deactivate करा
  • Transaction freeze करण्याचा प्रयत्न करा
  • Debit card किंवा net banking block करा

लवकर माहिती दिल्यास काही वेळा transaction थांबवणे शक्य होऊ शकते.


2.  1930 Cyber Helpline वर Complaint करा

भारत सरकारने cyber fraud साठी 1930 ही official helpline सुरू केली आहे.
Fraud झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर या नंबरवर call करा.

Complaint करताना पुढील माहिती तयार ठेवा:

  • Mobile number
  • Bank account details
  • Transaction ID
  • Fraud amount
  • Transaction time

लवकर complaint केल्यास पैसे recover होण्याची शक्यता वाढू शकते.


3.  Cyber Crime Portal वर Online Report करा

Cyber fraud ची official online complaint देखील करू शकता.
यासाठी भारत सरकारचे cyber crime portal वापरता येते.

Online complaint करताना:

  • Fraud screenshots upload करा
  • Transaction details भरा
  • Scammer number किंवा UPI ID द्या
  • Complete घटना स्पष्ट लिहा

हे future investigation साठी महत्वाचे ठरू शकते.


4.  UPI App Block किंवा Deactivate करा

जर तुम्हाला account access compromise झाल्याची शंका असेल तर:

  • Google Pay
  • PhonePe
  • Paytm
  • BHIM App

यांसारख्या UPI apps तात्पुरते block किंवा logout करा.
गरज असल्यास:

  • UPI PIN बदला
  • Password बदला
  • Linked bank account remove करा

5.  Transaction Screenshot आणि Details Save करा

Fraud संबंधित सर्व पुरावे सुरक्षित ठेवा कारण complaint आणि investigation साठी ते महत्वाचे असतात.

उदाहरण:

  • Transaction screenshot
  • SMS alerts
  • Scammer mobile number
  • UPI ID
  • WhatsApp chats
  • Call recording (असल्यास)

हे पुरावे police complaint आणि bank verification साठी उपयोगी पडतात.


 महत्वाची सूचना

Fraud झाल्यानंतर वेळ वाया घालवू नका.
जितक्या लवकर complaint केली जाईल तितकी पैसे recover होण्याची शक्यता वाढू शकते.

 

UPI कसे वापरावे? नवशिक्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शक (Step-by-Step Marathi Guide)

UPI PIN कसा सेट, Change आणि Reset करावा? (Step-by-Step Guide Marathi 2026)

 

निष्कर्ष

आज UPI मुळे ऑनलाइन व्यवहार करणे खूप सोपे झाले आहे, पण त्याचबरोबर online fraud चे प्रकारही वेगाने वाढत आहेत. अशा फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी जागरूक राहणे खूप आवश्यक आहे.

कोणत्याही unknown व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. OTP, UPI PIN किंवा banking माहिती कोणासोबतही share करू नका. कोणताही QR code scan करण्यापूर्वी आणि payment confirm करण्यापूर्वी transaction नीट तपासा.

लक्षात ठेवा — थोडी सावधगिरी आणि योग्य माहिती तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीपासून वाचवू शकते. सुरक्षित डिजिटल व्यवहार करा आणि आपल्या कुटुंबातील इतर लोकांनाही या scams बद्दल माहिती द्या.

 

 People Also Ask Questions

1. QR code scan केल्याने पैसे येतात का?

नाही. QR code scan केल्यावर payment process सुरू होते. पैसे receive करण्यासाठी QR code scan करण्याची गरज नसते.

 

2. UPI PIN share करणे सुरक्षित आहे का?

नाही. UPI PIN कोणालाही सांगू नये.

 

3.  UPI fraud झाल्यावर कुठे तक्रार करावी?

1930 cyber helpline किंवा official cyber crime portal वर तक्रार करू शकता.

 

4. Fake payment screenshot कसा ओळखावा?

Bank account balance आणि transaction history check केल्याशिवाय payment confirm करू नका.

 

5.  Screen sharing app सुरक्षित आहेत का?

Trusted कामासाठी सुरक्षित असू शकतात, पण unknown व्यक्तीच्या सांगण्यावरून install करणे धोकादायक असू शकते.

 

 

 

Leave a Comment