Mutual Fund म्हणजे काय? Mutual Fund ची संपूर्ण माहिती | प्रकार, फायदे, जोखीम, SIP, गुंतवणूक कशी करावी

पूर्वी बचत म्हटले की बँक खाते किंवा FD सारख्या पर्यायांना निवडले जात होते. पण आता अनेक लोक Mutual Fund ला प्राधान्य देताना दिसत आहेत, कारण आताच्या काळात फक्त पैसे बचत करून चालणार नाही, तर त्या पैशांची वाढ होणेही महत्त्वाचे आहे आणि यासाठी Mutual Fund सर्वोत्तम मार्ग आहे. कारण Mutual Fund मध्ये छोट्या रकमेतून गुंतवणूक सुरू करता येतेच, शिवाय भविष्यासाठी मोठी रक्कमही तयार होते.

Table of Contents

तरीही अनेकांच्या मनात काही सामान्य प्रश्न असतात —
Mutual Fund म्हणजे नेमके काय? यात पैसे सुरक्षित असतात का? SIP म्हणजे काय? किती पैसे गुंतवावेत? आणि खरंच यातून चांगला फायदा होतो का?

Mutual fund in marathi

जर तुम्हालाही हे प्रश्न पडत असतील, तर हे आर्टिकल तुमच्यासाठीच आहे. या लेखामध्ये आपण Mutual Fund विषयीची संपूर्ण माहिती अगदी साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. Mutual Fund कसे काम करते, त्याचे प्रकार, फायदे, जोखीम, SIP, गुंतवणूक कशी सुरू करावी आणि नवशिक्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे सर्व मुद्दे सविस्तर जाणून घेऊ.

 

Mutual Fund म्हणजे काय?

Mutual Fund म्हणजे अनेक लोकांचे पैसे एकत्र करून केलेली गुंतवणूक. हे पैसे शेअर मार्केट, बाँड्स किंवा इतर ठिकाणी गुंतवले जातात, ज्यामुळे पैशाची वाढ होण्याची शक्यता असते.

ही गुंतवणूक तज्ञ Fund Manager सांभाळतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला स्वतः शेअर मार्केटची जास्त माहिती असणे आवश्यक नसते.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर:

“अनेक लोक मिळून एक मोठा फंड तयार करतात आणि त्या पैशाची गुंतवणूक तज्ञ लोक विविध ठिकाणी करतात.”

सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाले तर, समजा 1,000 लोकांनी प्रत्येकी काही रक्कम एका फंडमध्ये गुंतवली. त्या सर्व पैशांचा एक मोठा फंड तयार होतो. त्यानंतर Fund Manager त्या पैशाची वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतो. जर त्या गुंतवणुकीवर नफा झाला, तर त्याचा फायदा गुंतवणूकदारांना मिळतो.

 

Mutual Fund कसे काम करते?

Mutual fund म्हणजे काय हे आपण पाहिले, आता हे कसे काम करते हे समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, यासाठी आपण एक साधे उदाहरण पाहू.

समजा 1,000 लोकांनी एका Mutual Fund योजनेमध्ये प्रत्येकी ₹5,000 गुंतवले.
म्हणजे त्या फंडमध्ये एकूण ₹50 लाख जमा झाले. हे जमा झालेले पैसे एकाच ठिकाणी ठेवले जात नाही, तर त्या पैशांची गुंतवणूक तज्ञ Fund Manager वेगवेगळ्या ठिकाणी करतात. जसे की

  •   मोठ्या कंपन्यांचे शेअर्स
  •   सरकारी बाँड्स
  •   सुरक्षित सिक्युरिटीज
  •   इतर गुंतवणूक पर्याय

या गुंतवणूकीमागील उद्देश हा असतो की, गुंतवणूकदारांच्या पैशाची वाढ करणे. ते कसे, तर

समजा, Fund Manager ने काही पैसे चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले आणि त्या कंपन्यांची वाढ झाली, तर त्या गुंतवणुकीची किंमतही वाढू शकते. त्यामुळे Mutual Fund च्या फंडची एकूण किंमत वाढते. याचा फायदा त्या फंडमध्ये गुंतवणूक केलेल्या सर्व लोकांना मिळतो.

 

Units म्हणजे काय?

जेव्हा तुम्ही mutual fund मध्ये पैसे गुंतवता, तेव्हा तुम्हाला त्या फंडचे काही unit मिळतात. हे unit म्हणजे त्या फंडमधील तुमचा हिस्सा.

जसे, तुम्ही एका फंड मध्ये ₹5,000 गुंतवले आणि एका unit ची किंमत ₹50 होती, तर तुम्हाला ₹5,000 मध्ये 100 units मिळतील. नंतर त्या एका unit ची किंमत ₹70 झाली, तर तुमच्याकडे असलेले 100 unit x ₹70 = ₹7,000 होईल. म्हणजे तुमच्या गुंतवणुकीची किंमत वाढली.

 

NAV म्हणजे काय?

Mutual Fund मधील एका Unit ची किंमत म्हणजे NAV (Net Asset Value).

फंडमधील गुंतवणुकीची किंमत वाढली किंवा कमी झाली तर NAV मध्येही बदल होतो.

 

Fund Manager ची भूमिका काय असते?

Fund Manager हा Mutual Fund मधील महत्त्वाचा भाग असतो.

Fund manager  कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची, किती पैसे गुंतवायचे आणि कधी खरेदी किंवा विक्री करायची हे सर्व निर्णय घेतो.

Mutual Fund

Mutual Fund मध्ये कोण गुंतवणूक करू शकतो?

Mutual Fund मध्ये जवळपास कोणतीही व्यक्ती आपल्या उत्पन्नानुसार गुंतवणूक करू शकते:

1. विद्यार्थी (Students)

कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थीही या पर्यायात गुंतवणूक सुरू करू शकतात. लहान वयात गुंतवणुकीची सवय लागल्यास भविष्यात आर्थिक शिस्त तयार होण्यास मदत होते.

2. नोकरी करणारे (Salaried Employees)

पगार मिळणाऱ्या लोकांसाठी Mutual Fund हा लोकप्रिय गुंतवणूक पर्याय मानला जातो.

3. व्यवसायिक (Business Owners)

व्यवसायामध्ये उत्पन्न नेहमी निश्चित नसते. त्यामुळे अतिरिक्त पैसे योग्य ठिकाणी गुंतवणे महत्त्वाचे ठरते. यासाठी Mutual Fund चा वापर करू शकतात.

4. गृहिणी (Housewives)

आज अनेक गृहिणी घरखर्चातून बचत करून SIP सुरू करत आहेत. महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टीनेही Mutual Fund उपयोगी ठरू शकतो.

5. निवृत्त व्यक्ती (Retired Persons)

निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न कमी होऊ शकते. अशा वेळी काही लोक सुरक्षित आणि स्थिर परताव्यासाठी Debt Mutual Fund किंवा Hybrid Fund निवडतात.

 

Mutual Fund सुरू करण्यासाठी काय आवश्यक असते?

Mutual Fund मध्ये गुंतवणूक सुरू करण्यासाठी काही मूलभूत कागदपत्रे आवश्यक असतात:

  • PAN Card
  • Aadhaar Card
  • Mobile Number
  • Bank Account

तसेच KYC (Know Your Customer) पूर्ण करणे आवश्यक असते.

 

Mutual Fund चे प्रमुख प्रकार

Mutual Fund चे अनेक प्रकार पडतात. प्रत्येक फंडची गुंतवणूक पद्धत, जोखीम आणि परतावा वेगवेगळा असतो. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी कोणता फंड कसा काम करतो हे समजून घेणे महत्त्वाचे असते.

आपल्या आर्थिक उद्दिष्टानुसार, जोखीम घेण्याची तयारी आणि गुंतवणुकीचा कालावधी यानुसार योग्य Mutual Fund निवडणे गरजेचे असते.

1. Equity Mutual Fund

Equity Mutual Fund मध्ये प्रामुख्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली जाते. म्हणजेच या फंडमधील पैसे विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात.

जेव्हा कंपन्यांची वाढ होते आणि त्यांच्या शेअर्सची किंमत वाढते, तेव्हा या फंडची किंमतही वाढू शकते. त्यामुळे दीर्घकालीन काळात चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते.

Equity Fund कसे काम करतात?

Fund Manager वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स निवडतो.
उदाहरणार्थ IT कंपन्या, Banking कंपन्या, Pharma कंपन्या, Large Companies किंवा Small Companies यामध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते.

Equity Mutual Fund चे फायदे

  • दीर्घकालीन काळात Equity Funds इतर अनेक गुंतवणूक पर्यायांपेक्षा जास्त परतावा देऊ शकतात.
  • 10 ते 15 वर्षांसारख्या दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यास मोठा निधी तयार होण्यास मदत होऊ शकते.
  • महागाई वाढत असताना पैशाची वाढ होणे महत्त्वाचे असते. Equity Fund दीर्घ काळात महागाईपेक्षा जास्त परतावा देण्याचा प्रयत्न करतात.

Equity Mutual Fund मधील जोखीम

शेअर मार्केटमध्ये चढ-उतार होत असल्यामुळे Equity Funds मध्ये जोखीम जास्त असते. म्हणूनच Equity Fund मध्ये दीर्घकालीन गुंतवणूक अधिक योग्य मानली जाते.

 

2. Debt Mutual Fund

Debt Mutual Fund हे तुलनेने सुरक्षित मानले जाणारे फंड असतात. या फंडमध्ये प्रामुख्याने सरकारी बाँड्स, कंपन्यांचे बाँड्स आणि इतर सुरक्षित साधनांमध्ये गुंतवणूक केली जाते.

हे फंड शेअर मार्केटपेक्षा कमी जोखमीचे मानले जातात.

Debt Fund कसे काम करतात?

या फंडमधील पैसे Government Bonds, Corporate Bonds, Treasury Bills, Fixed Income Securities यातून नियमित व्याजासारखा परतावा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.

Debt Mutual Fund चे फायदे

  • Equity Fund च्या तुलनेत Debt Funds मध्ये चढ-उतार कमी असतात.
  • हे फंड तुलनेने स्थिर आणि नियमित परतावा देण्याचा प्रयत्न करतात.
  • कमी कालावधीच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी काही लोक Debt Funds निवडतात.

Debt Mutual Fund मधील जोखीम

Debt Funds पूर्णपणे Risk-Free नसतात.

उदा. Interest Rate बदल, Bond Issuer ची आर्थिक अडचण याचा परिणाम फंडवर होऊ शकतो.

3. Hybrid Mutual Fund

Hybrid Mutual Fund मध्ये Equity आणि Debt दोन्ही प्रकारच्या गुंतवणुकीचा समावेश असतो. म्हणजेच काही पैसे शेअर मार्केटमध्ये आणि काही सुरक्षित साधनांमध्ये गुंतवले जातात.

Hybrid Fund चे फायदे

  • Equity मुळे वाढीची संधी मिळते आणि Debt मुळे स्थिरता मिळते.
  • जास्त Risk न घेता Mutual Fund मध्ये सुरुवात करू इच्छिणाऱ्यांसाठी हा पर्याय चांगला मानला जातो.
  • एकाच फंडमध्ये वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक मिळते.

4. Index Fund

Index Fund हे Passive Mutual Funds असतात. हे फंड एखाद्या Index चे अनुसरण करतात.

जसे Nifty 50, Sensex

जर Nifty मधील कंपन्या वाढल्या, तर Index Fund ची किंमतही वाढू शकते.

Index Fund कसे काम करतात?

हे फंड त्या Index मधील कंपन्यांमध्ये त्याच प्रमाणात गुंतवणूक करतात.

उदाहरण: जर Nifty 50 मध्ये Reliance, Infosys, HDFC Bank असतील, तर Index Fund सुद्धा त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो.

Index Fund चे फायदे

हे Passive Funds असल्यामुळे Expense Ratio तुलनेने कमी असतो.

दीर्घ काळासाठी साधी आणि कमी खर्चाची गुंतवणूक मानली जाते.

जोखीम कमी असते, कारण Fund Manager वारंवार शेअर्स निवडत नाही.

Mutual Fund

SIP म्हणजे काय?

SIP म्हणजे Systematic Investment Plan.
SIP ही Mutual Fund मध्ये गुंतवणूक करण्याची एक सोपी आणि लोकप्रिय पद्धत आहे.

तुम्ही SIP सुरू केली, तर तुम्हाला SIP मध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम mutual fund मध्ये गुंतवावी लागते. जसे, ₹500 प्रति महिना, ₹1,000 प्रति महिना, ₹5,000 प्रति महिना अशा प्रकारे नियमितपणे पैसे गुंतवावे लागतात.

अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, जशी आपण दर महिन्याला बचत करतो, तशीच दर महिन्याला mutual fund मध्ये गुंतवणूक करणे यालाच SIP म्हणतात.

SIP मध्ये छोट्या रकमेतून मोठी रक्कम तयार करण्यासाठी चांगली पद्धत मानली जाते.

उदाहरणार्थ, तुम्ही दर महिन्याला ₹5,000 ची SIP 15 वर्षांसाठी सुरू केली, यावर तुम्हाला सरासरी 12% परतावा जरी गृहीत धरला तरी भविष्यात एक मोठी रक्कम तयार होऊ शकते.

 

Lump Sum Investment म्हणजे काय?

Lump Sum Investment म्हणजे एकाच वेळी मोठी रक्कम Mutual Fund मध्ये गुंतवली जाते.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, दर महिन्याला थोडी-थोडी गुंतवणूक करण्याऐवजी एकदाच पूर्ण रक्कम गुंतवणे म्हणजे Lump Sum Investment.

जसे तुम्ही एका mutual fund मध्ये एकदाच ₹50,000 किंवा  ₹1 लाख गुंतवले, तर ही  Lump Sum गुंतवणूक मानली जाते.

Lump Sum Investment मध्ये एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवली जात असल्याने यात मार्केट जोखीम असते. जर तुम्ही मार्केट खाली असताना एकरकमी गुंतवणूक केली आणि नंतर मार्केट वाढले, तर चांगला परतावा मिळू शकतो. याउलट मार्केट खाली आल्यास गुंतवणुकीची किंमत कमी होऊ शकते.

 

Mutual Fund चे फायदे

Mutual fund मध्ये कमी रकमेतून गुंतवणूक सुरू करता येत असल्याने आज अनेकजण mutual fund मध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. जर तुम्हालाही या फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर त्याचे फायदे माहीत असणे गरजेचे आहे.

1. Professional Management (तज्ञांकडून गुंतवणुकीचे व्यवस्थापन)

mutual fund मध्ये आपल्या पैशाची गुंतवणूक तज्ञ fund manager सांभाळतात. सामान्य माणसाला शेअर मार्केटचे ज्ञान कमी असते, जसे कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक करावी, कधी पैसे गुंतवावे किंवा कधी विक्री करावी यासाठी अनुभव आणि अभ्यास असणे आवश्यक असतो. त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाला रोज मार्केट पाहणे किंवा कंपन्यांचा अभ्यास करणे शक्य नसते.

मात्र mutual fund मध्ये fund manager मार्केटचा अभ्यास करून चांगल्या कंपन्या निवडतात व जोखीम कमी ठेवण्याचा प्रयत्न करतात, म्हणून mutual fund हा नवशिक्यासाठीही सोपा पर्याय मानला जातो.

 

2. Diversification (वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक)

Mutual fund मध्ये पैसे अनेक कंपन्यांमध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, विविध गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवले जातात. यालाच Diversification म्हणतात.

याचा फायदा असा होतो की, समजा तुम्ही तुमचे सर्व पैसे एका कंपनीमध्ये गुंतवले आणि त्या कंपनीला भविष्यात नुकसान झाले, तर मोठा तोटा होऊ शकतो. म्हणून fund मध्ये banking, IT, Pharma, Automobile अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील कंपन्या असू शकतात.

त्यामुळे आपले एखाद्या क्षेत्रांतील कंपनीचे नुकसान झाले तरी संपूर्ण गुंतवणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता कमी होते.

 

3. कमी रकमेपासून सुरुवात करता येते

तुम्हालाही यात गुंतवणूक करायची असेल, तर कोणत्याही मोठ्या रकमेची गरज नसते. अनेक SIP योजना ₹100, ₹500, ₹1,000 पासूनही सुरू करता येतात.

म्हणून विद्यार्थी, नोकरी करणारे, गृहिणीसुध्दा गुंतवणूक सुरू करू शकतात. याचमुळे mutual fund सामान्य लोकांसाठी सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय बनला आहे.

 

4. Liquidity (गरज पडल्यास पैसे काढण्याची सुविधा)

Mutual fund मधील अनेक अशा योजना आहेत, ज्यात तुम्हाला गरज पडल्यास पैसे काढता येतात. जसे अचानक आलेला खर्च, वैद्यकीय गरज, आपत्तीजनक परिस्थिती अशा वेळी तुम्ही केलेली गुंतवणूक विकून पैसे मिळवता येते.

मात्र काही योजनांमध्ये ठराविक कालावधीपूर्वी पैसे काढल्यास Exit Load लागू शकतो, त्यामुळे योजना समजून घेणे महत्त्वाचे असते.

 

5. दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यास मदत

 Mutual fund मध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते.

जर तुम्ही नियमित SIP करत असाल आणि ही गुंतवणूक दीर्घकाळासाठी कायम ठेवली, तर Compounding चा फायदा मिळू शकतो. यामुळे भविष्यात मोठा निधी तयार होण्याची शक्यता असते.

 

6. SIP मुळे नियमित बचतीची सवय लागते

Mutual fund मध्ये तुम्ही जर SIP सुरू केली, तर दर महिन्याला न चुकता ठराविक रक्कम गुंतवली जाते. यामुळे तुमच्यात बचतीची सवय तयार होते, आर्थिक शिस्त लागते व भविष्यासाठी निधी तयार होतो.

 

7. महागाईवर मात करण्याची संधी

तुम्ही आज करून ठेवलेली बचत भविष्यात महागाईमुळे त्या पैशाची किंमत कमी होत जाते. जसे, आज ₹100 मध्ये मिळणारी वस्तू भविष्यात ₹150 ला मिळू शकते.

Mutual fund मध्ये दीर्घकालीन काळात पैशाची वाढ होते, त्यामुळे महागाईवर मात करण्यास मदत होऊ शकते.

 

Mutual Fund मधील जोखीम

Mutual fund मार्केटशी संबंधित असल्यामुळे त्यात काही जोखीम असतात, म्हणूनच या गुंतवणुकीत  गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील जोखीम समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

1. Market Risk (मार्केट जोखीम)

Mutual Fund मधील सर्वात सामान्य जोखीम म्हणजे Market Risk.

Mutual fund प्रकारातील Equity Mutual Fund हे शेअर मार्केटशी संबंधित असल्यामुळे मार्केटमध्ये चढ-उतार झाले, तर फंडच्या किंमतीवर त्याचा परिणाम होतो.

 

2. Interest Rate Risk (व्याजदर जोखीम)

ही जोखीम प्रामुख्याने Debt Mutual Fund मध्ये दिसते.

Debt Funds मध्ये सरकारी बाँड्स किंवा इतर Fixed Income साधनांमध्ये गुंतवणूक करतात. जेव्हा बाजारातील व्याजदर बदलतात, तेव्हा या गुंतवणुकीच्या किमतीवर परिणाम होतो.

 

3. Economic Changes (आर्थिक बदलांची जोखीम)

देशाची अर्थव्यवस्था, महागाई, जागतिक परिस्थिती किंवा सरकारी धोरणांचा Mutual Fund वर परिणाम होऊ शकतो.

उदा. महागाई वाढणे, आर्थिक मंदी, युद्धसदृश परिस्थिती, जागतिक बाजारातील घसरण अशा गोष्टींमुळे मार्केटमध्ये अस्थिरता वाढू शकते.

त्याचा परिणाम Mutual Fund च्या किंमतीवरही होतो.

 

4. Company Risk (कंपनी संबंधित जोखीम)

जर Mutual Fund ने गुंतवणूक केलेल्या एखाद्या कंपनीची आर्थिक परिस्थिती खराब झाली, तर त्या कंपनीच्या शेअरची किंमत कमी होऊ शकते. याचा परिणाम फंडच्या परताव्यावर होऊ शकतो.

 

Mutual Fund मध्ये गुंतवणूक कशी सुरू करावी?

Mutual Fund मध्ये गुंतवणूक कशी सुरू करावी?

Mutual Fund मध्ये गुंतवणूक सुरू करणे आजच्या काळात खूप सोपे झाले आहे. मोबाईल App च्या मदतीने काही मिनिटांत SIP सुरू करता येते. खालील स्टेप्स फॉलो करून तुम्ही सहज गुंतवणूक सुरू करू शकता.


 Step 1: KYC पूर्ण करा

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करण्यासाठी KYC (Know Your Customer) पूर्ण करणे आवश्यक असते.

यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • PAN Card
  • Aadhaar Card
  • Mobile Number
  • Bank Account

KYC पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सहजपणे Mutual Fund मध्ये गुंतवणूक करू शकता.


 Step 2: Investment App निवडा

आज अनेक मोबाईल Apps द्वारे Mutual Fund मध्ये ऑनलाइन गुंतवणूक करता येते.

लोकप्रिय Apps:

  • Groww
  • Zerodha Coin
  • Paytm Money
  • ET Money

या Apps मध्ये Account तयार करून KYC पूर्ण केल्यानंतर गुंतवणूक सुरू करता येते.


 Step 3: योग्य Mutual Fund निवडा

गुंतवणूक करण्यापूर्वी आपले आर्थिक उद्दिष्ट ठरवणे महत्त्वाचे असते.

उदाहरण:

  • भविष्यासाठी बचत
  • मुलांचे शिक्षण
  • घर खरेदी
  • निवृत्ती नियोजन

आपल्या उद्दिष्टानुसार Equity Fund, Debt Fund किंवा Hybrid Fund निवडता येतो.


 Step 4: SIP सुरू करा

योग्य Fund निवडल्यानंतर तुम्ही SIP सुरू करू शकता.

बँक खाते लिंक करून Auto Debit सुरू केल्यास दर महिन्याला ठराविक रक्कम आपोआप Mutual Fund मध्ये गुंतवली जाते.

तुम्ही ₹100, ₹500 किंवा आपल्या बजेटनुसार SIP सुरू करू शकता.

 

योग्य Mutual Fund कसा निवडावा?

अनेक लोक जास्त परतावा पाहून mutual fund निवडतात, मात्र हे चुकीचे ठरते, कारण प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक उद्दिष्ट, उत्पन्न, जोखीम घेण्याची क्षमता वेगळी असते. म्हणून mutual fund कसा निवडावा हे माहीत असणे गरजेचे आहे.

1. आपले Investment Goal ठरवा

Mutual fund निवडण्यापूर्वी तुम्ही गुंतवणूक कशासाठी करत आहात हे स्पष्ट असायला हवे. उदा. मुलांचे शिक्षण, घर खरेदी, निवृत्ती नियोजन इ. ह्या दीर्घकालीन उद्दिष्टासाठी Equity Fund योग्य ठरू शकतो.

तर कमी कालावधीसाठी Debt Fund किंवा Hybrid Fund निवडणे योग्य ठरू शकते.

2. Risk Level समजून घ्या

प्रत्येक Mutual Fund मध्ये जोखीम वेगवेगळी असते.

Equity Fundजास्त जोखीम पण जास्त परताव्याची शक्यता

Debt Fundकमी जोखीम व  तुलनेने स्थिर परतावा

Hybrid Fundजोखीम आणि परतावा यामध्ये संतुलन

जर तुम्हाला Market मधील चढ-उतार सहन होत नसतील, तर कमी Risk असलेले फंड निवडणे चांगले.

3. Fund Performance तपासा

Mutual fund निवडताना त्या फंडने मागील काही वर्षांमध्ये किती परतावा दिला आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरते. हा performance पाहताना 3 वर्षांचा, 5 वर्षांचा, 10 वर्षांचा पाहणे गरजेचे  असते.

4. Expense Ratio तपासा

Mutual Fund व्यवस्थापित करण्यासाठी AMC (Asset Management Company) काही शुल्क आकारते. त्यालाच Expense Ratio म्हणतात.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, फंड चालवण्यासाठी घेतले जाणारे वार्षिक शुल्क म्हणजे Expense Ratio.

जर Expense Ratio जास्त असेल तर तुमच्या परताव्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून शक्य असल्यास कमी Expense Ratio असलेले फंड घेणे फायद्याचे ठरते

5. Fund Manager चा अनुभव पाहा

Mutual fund मधील fund manager हा महत्त्वाचा भाग असतो. Fund manager कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची, किती गुंतवणूक करायची, कधी खरेदी किंवा विक्री करायची हे निर्णय घेतो.

 

Mutual Fund वर किती परतावा मिळतो?

Mutual fund मध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला, मला व आपल्या सर्वाना पडलेला सर्वात मोठा प्रश्न तो  म्हणजे “Mutual Fund मध्ये किती परतावा मिळतो?”

या प्रश्नाचे उत्तर सांगणे कठीण आहे कारण Mutual Fund मधील परतावा हा शेअर मार्केट, अर्थव्यवस्था आणि फंडच्या प्रकारावर अवलंबून असतो.

Mutual Fund मधील परतावा खालील गोष्टींवर अवलंबून असतो:

  • मार्केटची परिस्थिती
  • फंडचा प्रकार
  • गुंतवणुकीचा कालावधी
  • Fund Manager चे निर्णय
  • अर्थव्यवस्थेतील बदल

दीर्घकालीन काळात चांगल्या फंडमध्ये परतावा मिळण्याची शक्यता जास्त असते.

Mutual Fund

उदाहरण

तुम्ही mutual fund मध्ये SIP सुरू करून नियमित गुंतवणूक केली आणि दीर्घ काळासाठी ती कायम ठेवली, तर Compounding मुळे चांगला निधी तयार होऊ शकतो.

तुम्ही दर महिन्याला ₹5,000 SIP सुरू केली, 10 वर्षे गुंतवणूक सुरू ठेवली त्यावर तुम्हाला सरासरी 12% वार्षिक परतावा मिळाला

दर महिन्याला ₹5,000 प्रमाणे

वर्षाची गुंतवणूक = ₹60,000 असे 10 वर्षांची एकूण गुंतवणूक = ₹6 लाख

म्हणजे तुमच्या खिशातून एकूण ₹6 लाख गुंतवले जातील. Mutual Fund मध्ये मिळणारा परतावा पुन्हा गुंतवला जातो. यालाच Compounding म्हणतात.

जर 12% सरासरी परतावा मिळाला तर गुंतवणूक = ₹6 लाख  आणि अंदाजे Final Value = ₹11 लाखांपेक्षा जास्त म्हणजे जवळपास ₹5 लाखांपेक्षा जास्त वाढ होऊ शकते.

Compounding म्हणजे “मिळालेल्या नफ्यावर पुन्हा नफा मिळवणे” हे Mutual Fund मधील सर्वात मोठे फायदेपैकी एक मानले जाते.

लहान रकमेपासून सुरू केलेली SIP भविष्यात मुलांचे शिक्षण, घर किंवा निवृत्तीसाठी मोठा निधी तयार करू शकते

 

Mutual Fund आणि FD मधील फरक

 Mutual Fund vs FD

कोणता पर्याय तुमच्यासाठी योग्य? सोप्या भाषेत समजून घ्या

मुद्दा 📈 Mutual Fund 🏦 FD (Fixed Deposit)
परतावा जास्त परताव्याची शक्यता असते निश्चित व्याजदर मिळतो
जोखीम मार्केटशी संबंधित जोखीम असते तुलनेने कमी जोखीम
कालावधी Flexible – कधीही गुंतवणूक सुरू/बंद करता येते ठराविक कालावधीसाठी पैसे ठेवावे लागतात
महागाईवर मात दीर्घकालीन काळात मदत होऊ शकते मर्यादित वाढ
Liquidity अनेक योजनांमध्ये पैसे सहज काढता येतात मुदतपूर्व पैसे काढल्यास दंड लागू शकतो
कोणासाठी योग्य? दीर्घकालीन संपत्ती निर्माण करू इच्छिणारे सुरक्षित आणि निश्चित परतावा पसंत करणारे

 लक्षात ठेवा:
जर तुम्हाला सुरक्षित आणि निश्चित परतावा हवा असेल तर FD योग्य ठरू शकते. पण दीर्घकालीन काळात पैशाची वाढ आणि महागाईवर मात करण्यासाठी Mutual Fund हा चांगला पर्याय मानला जातो.

 

निष्कर्ष

Mutual Fund हा दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा लोकप्रिय आणि प्रभावी मार्ग मानला जातो. SIP द्वारे छोट्या रकमेपासूनही गुंतवणूक सुरू करता येते. मात्र कोणतीही योजना निवडण्यापूर्वी तिची जोखीम, उद्दिष्ट आणि कालावधी समजून घेणे आवश्यक आहे.

जर तुम्ही गुंतवणुकीची सुरुवात करू इच्छित असाल, तर लहान SIP पासून सुरुवात करून नियमित गुंतवणूक करण्याची सवय लावू शकता. योग्य नियोजन, संयम आणि दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवला, तर Mutual Fund भविष्यात आर्थिक स्थैर्य आणि संपत्ती निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

 

SIP म्हणजे काय? SIP मध्ये गुंतवणूक कशी सुरू करावी | Beginner साठी संपूर्ण माहिती

 

People Also Ask Questions

1. Mutual Fund सुरक्षित आहे का?

हो, Mutual Fund हे SEBI द्वारे नियंत्रित केले जातात. पण Market Risk असतो.

 

2. SIP आणि Mutual Fund मध्ये फरक काय?

Mutual Fund हा गुंतवणुकीचा प्रकार आहे, तर SIP ही गुंतवणूक करण्याची पद्धत आहे.

 

3. किती पैशांपासून SIP सुरू करता येते?

काही योजनांमध्ये ₹100 पासूनही SIP सुरू करता येते.

 

4. Mutual Fund मध्ये पैसे कधी काढता येतात?

Open-ended Funds मध्ये कधीही पैसे काढता येतात.

 

5. नवशिक्यांसाठी कोणता Mutual Fund चांगला?

Index Fund किंवा Hybrid Fund हे नवशिक्यांसाठी चांगले मानले जातात.

 

 

Leave a Comment