SIP म्हणजे काय? SIP मध्ये गुंतवणूक कशी सुरू करावी | Beginner साठी संपूर्ण माहिती

तुम्ही दर महिन्याला पैसे वाचवण्याचा प्रयत्न करता, पण अचानक येणारे खर्च, वाढती महागाई आणि भविष्याची चिंता यामुळे तुम्हाला बचत करणे शक्य होत नाही. अशा वेळी तुम्हाला एक प्रश्न नेहमी पडत असेल, “फक्त थोडे-थोडे पैसे गुंतवून भविष्यात मोठा फंड तयार करता येऊ शकतो का?”

Table of Contents

याच प्रश्नाचे उत्तर म्हणजे SIP.

आजकाल सोशल मीडिया, YouTube किंवा तुमच्या मित्र मंडळीकडून SIP बद्दल तुम्हाला खूप ऐकायला मिळत असेल. काही लोक म्हणतात SIP भविष्यासाठी चांगली आहे, तर काही लोकांना भीती वाटते की यात पैसे बुडू शकतात.

 

चला तर मग, SIP बद्दलची सविस्तर माहिती पाहूयात, जसे की

SIP म्हणजे काय?
ती कशी काम करते?
फक्त ₹500 पासून SIP सुरू करता येते का?
आणि नवशिक्या (Beginner) लोकांनी गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात?

या आर्टिकलमध्ये आपण SIP बद्दलची संपूर्ण माहिती अगदी सोप्या मराठीत आणि वास्तविक उदाहरणांसह जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला दुसरे कोणतेही Article वाचण्याची गरज पडणार नाही.

SIP म्हणजे काय?

SIP हा शब्द अनेक लोकांनी ऐकलेला असेल, पण नेमके SIP म्हणजे काय हे अनेक नवशिक्यांना समजत नाही.

SIP चा पूर्ण अर्थ Systematic Investment Plan असा होतो.

SIP म्हणजे दर महिन्याला ठराविक रक्कम Mutual Fund मध्ये गुंतवण्याची पद्धत.
यामध्ये तुम्ही एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी थोडी-थोडी रक्कम नियमितपणे गुंतवता.

या प्लॅनमध्ये तुम्हाला एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नसते.

तुम्ही तुमच्या बजेटनुसार ₹500, ₹1000, ₹2000 अशा छोट्या रकमेपासूनही सुरुवात करू शकता. जसे तुम्ही दर महिन्याला मोबाईल रिचार्ज करता, वीज बिल भरता, त्याचप्रमाणे SIP मध्येही दर महिन्याला ठराविक रक्कम आपोआप गुंतवली जाते.

याही पेक्षा आणखी सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर,

SIP म्हणजे एका प्रकारची नियमित गुंतवणूक करण्याची सवय आहे. जसे तुम्ही दर महिन्याला गल्ल्यामध्ये पैसे टाकता, तसेच SIP मध्ये पैसे Mutual Fund मध्ये जमा केले जातात.

उदाहरण – राहुल दर महिन्याला ₹1000 ऑनलाइन शॉपिंगमध्ये खर्च करतो. जर त्याने ही रक्कम 10–15 वर्षे SIP मध्ये गुंतवली, तर भविष्यात मोठा फंड तयार होण्याची शक्यता असू शकते. जसे तुम्ही एखाद्या रोपाला दररोज पाणी दिल्यास ते मोठे होते, त्याचप्रमाणे SIP मध्ये दर महिन्याला थोडी गुंतवणूक केल्यास भविष्यात मोठा फंड तयार होऊ शकतो.

SIP कसे काम करते?

तुम्हाला ही SIP सुरू करायची असेल, तर SIP मध्ये नेमके काय होते, ते कसे काम करते हे समजून घेणे खूप आवश्यक आहे. अनेक लोक SIP सुरू करतात, पण SIP मध्ये नेमके काय होते हे पूर्णपणे समजून घेत नाहीत. त्यामुळे “माझे पैसे कुठे जातात?”, “Units म्हणजे काय?”, “मार्केट खाली गेल्यावर नुकसान होते का?” असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

SIP सुरू केल्यावर नेमके काय होते?

हा मुद्दा समजून घेताना आपण एक उदाहरण घेऊ, समजा तुम्ही एका Mutual Fund मध्ये दर महिन्याला ₹1000 ची SIP सुरू केली.

  • प्रत्येक महिन्याला तुमच्या बँक खात्यातून ₹1000 आपोआप कट होतात.
  • ती रक्कम निवडलेल्या Mutual Fund मध्ये गुंतवली जाते.
  • त्याबदल्यात तुम्हाला त्या Fund चे काही Units मिळतात.

ही प्रक्रिया दर महिन्याला पुन्हा होत राहते.

Units म्हणजे काय?

Mutual Fund मध्ये तुम्ही गुंतवलेले पैसे “Units” च्या स्वरूपात बदलले जातात.

जसे तुम्ही दुकानातून वस्तु घेतल्यावर Quantity मिळते तसेच Mutual Fund मध्ये पैसे गुंतवल्यावर Units मिळतात.

NAV म्हणजे काय?

प्रत्येक Mutual Fund Unit ची एक किंमत असते. त्या किंमतीला NAV (Net Asset Value) म्हणतात. म्हणजेच एका mutual fund unit ची किंमत म्हणजे NAV.

हे समजण्यासाठी एक उदाहरण पाहू,

महिना गुंतवणूक NAV मिळालेले Units
जानेवारी ₹1000 ₹10 100 Units
फेब्रुवारी ₹1000 ₹8 125 Units
मार्च ₹1000 ₹12 83 Units

 

या उदाहरणातून काय समजते?

  1. Market खाली असताना जास्त Units मिळतात

फेब्रुवारीमध्ये NAV ₹8 होता. म्हणून, ₹1000 मध्ये 125 Units मिळाले. कारण Unit ची किंमत कमी होती.

  1. Market वर असताना कमी Units मिळतात

मार्चमध्ये NAV ₹12 झाला. म्हणून, ₹1000 मध्ये फक्त 83 Units मिळाले. कारण Unit महाग झाला होता.

याचा फायदा म्हणजे,

  • Market खाली असताना जास्त Units मिळतात
  • Market वर असताना कमी Units मिळतात

यामुळे दीर्घकाळात तुमची Average buying cost balanced राहण्यास मदत होते. यालाच सामान्यत “Rupee Cost Averaging” म्हणतात.

थोडक्यात सांगायचे झाले तर, SIP मध्ये तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम Mutual Fund मध्ये गुंतवता. त्या पैशातून तुम्हाला Fund चे Units मिळतात. Market खाली असताना जास्त Units आणि Market वर असताना कमी Units मिळतात. त्यामुळे दीर्घकाळात Average investment संतुलित राहण्यास मदत होते.

SIP मध्ये गुंतवणूक का करावी?

सतत वाढत चाललेली महागाई, वाढणारा खर्च व भविष्यातील मोठ्या होत चाललेल्या गरजा यांचा  विचार करता, फक्त बचत करून मोठा फंड तयार होणार नाही. यामुळेच SIP सारख्या गुंतवणुकीकडे लोकांचा कल वाढत आहे.

अनेक लोक गुंतवणूक सुरू का करत नाहीत?

Beginner लोकांच्या मनात काही सामान्य भीती असते.

  • “माझ्याकडे जास्त पैसे नाहीत”
  • “गुंतवणूक करणे risky आहे”
  • “शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे”
  • “गुंतवणूक फक्त श्रीमंत लोकांसाठी असते”
  • “मला finance बद्दल knowledge नाही”

यामुळे अनेक लोक गुंतवणूक सुरूच करत नाहीत. पण आता SIP च्या माध्यमातून तुम्ही अगदी कमी रकमेपासूनही सुरुवात करू शकता.

SIP मध्ये कमी पैशांपासून सुरुवात करता येते.

तुम्हीही SIP सुरू करण्याचा विचार करत असाल, तर फक्त ₹500, ₹1000 पासून सुरू करता येते. म्हणूनच SIP विद्यार्थी, नोकरी करणारे, छोटे व्यवसाय करणारे, गृहिणी यांच्यासाठीही योग्य आहे.

SIP मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी का उपयुक्त आहे?

मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये EMI, घरखर्च, शिक्षण, वैद्यकीय खर्च यामुळे गुंतवणूक करता येत नाही किंवा त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्याकडून गुंतवणूक होत नाही.

मात्र, SIP मध्ये थोडी-थोडी गुंतवणूक करता येते, महिन्यातून एक ठराविक रक्कम SIP मध्ये गुंतवली जाते, यामुळे बचतीची सवय लागते.

SIP Monthly Salary असणाऱ्यांसाठी का चांगली आहे?

महिन्याला पगार मिळणाऱ्या लोकांसाठी SIP फायदेशीर आहे, कारण पगार आल्यावर आपोआप गुंतवणूक होते, वेगळे नियोजन करावे लागत नाही, दर महिन्याला एक शिस्त तयार होते, जसे EMI, मोबाईल रिचार्ज, Subscription दर महिन्याला आपोआप चालते, तसेच SIP देखील आपोआप चालू राहते.

SIP मध्ये “शिस्तबद्ध गुंतवणूक” होते.

अनेक लोक दर महिन्याला बचत करण्याचा प्रयत्न करतात, मात्र बचत होतच नाही, प्रत्यक्षात बचत होण्याऐवजी पैसे खर्च होतात व बचत मागे पडते. SIP मध्ये मात्र ठराविक तारखेला गुंतवणूक आपोआप होते, यामुळे पहिले बचतीला प्राधान्य मिळते.

SIP भविष्यासाठी उपयुक्त का मानली जाते?

SIP मध्ये Profit मिळतो असे नाही, तर तुमच्या भविष्यातील ध्येय पूर्ण करण्यासाठी उपयोगी येते. जसे मुलांचे शिक्षण, घर, निवृत्ती, Emergency Fund, प्रवास अशा मोठ्या ध्येयांना दीर्घकालावधीमध्ये छोट्या रकमेतून मोठा फंड तयार करण्यासाठी SIP उपयोगी ठरू शकते. SIP मुळे तुमचे ध्येय पूर्ण होण्यास मदत होते.

SIP  नवशिक्या लोकांसाठी चांगली का मानली जाते?

नवशिक्या लोकांसाठी SIP सर्वोत्तम गुंतवणूक मानली जाते.

  • Sip मध्ये नियमित गुंतवणूक केल्यामुळे Market timing करावे लागत नाही.
  • एकाच वेळी मोठे पैसे लागत नाहीत.
  • नियमित गुंतवणूक करता येते.
  • Simple process आहे.
  • Online सुरू करता येते.

म्हणून अनेक नवशिके गुंतवणूकदार SIP पासून गुंतवणुकीचा प्रवास सुरू करतात.

 

SIP चे फायदे –

आजच्या काळात SIP कडे आकर्षित होण्याचे मुख्य कारण म्हणजे कमी रकमेपासूनही गुंतवणूक सुरू करण्याचा हा एक सोपा मार्ग मानला जातो.

1. कमी पैशांपासून सुरुवात करता येते

पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्या लोकांचा असा गैरसमज असतो की गुंतवणूक करण्यासाठी हजारो किंवा लाखो रुपये लागतात. यामुळे ते गुंतवणूक सुरूच करत नाहीत. मात्र SIP मध्ये तुम्ही अगदी कमी रकमेपासून सुरुवात करू शकता, हे sip चे सर्वात मुख्य वैशिष्ट्य आहे. अनेक Mutual Funds मध्ये ₹500, ₹1000 पासून SIP सुरू करता येते.

Beginner लोकांसाठी sip पासून गुंतवणूक करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे.

 

2. नियमित बचतीची सवय लागते

नवीन गुंतवणूकदार बचत करण्याचा प्रयत्न करतात पण महिन्याच्या शेवटी पैसेच उरत नाहीत, अचानक आलेल्या खर्चामुळे बचत करणे शक्य होत नाही किंवा बचत पुढे ढकलली जाते. तुम्हालाही ही कारणे जाणवत असतील, तर sip सुरू करून दर महिन्याला बचत करू शकता. यात दर महिन्याला ठराविक तारखेला पैसे आपोआप invest होतात. या सवयीमुळे आर्थिक शिस्त लागते, नियमित बचत होते आणि भविष्यासाठी केलेले नियोजन यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

 

3. Compounding चा फायदा मिळतो

हा sip चा सर्वात महत्त्वाचा फायदा मानला जातो. Compounding म्हणजे तुमच्या पैशावर मिळालेल्या परताव्यावर पुन्हा परतावा मिळणे. सुरुवातीला हा फायदा छोटा वाटू शकतो, पण दीर्घकाळात त्याचा मोठा परिणाम दिसू शकतो. आपण हे एका उदहरणाने समजून घेऊ.

समजा, तुम्ही दर महिन्याला ₹1000 SIP मध्ये गुंतवता. पहिल्या काही वर्षात फार मोठा फरक जाणवणार नाही पण पुढील 10 वर्षे, 15 वर्षे, 20 वर्षे नियमित गुंतवणूक केल्यास compounding मुळे fund मोठा होण्याची शक्यता वाढते.

 

4. Market Timing ची गरज नसते

अनेक beginner लोक sip करताना पहिले हा विचार करतात की “Market खाली आल्यावर गुंतवणूक करावी”, “आता योग्य वेळ आहे का?”

Market कधी वर जाईल किंवा खाली येईल हे अचूक सांगणे खूप कठीण असते. Sip मध्ये तुम्ही दर महिन्याला नियमित गुंतवणूक करत असल्यामुळे market वर असो किंवा खाली तरीही गुंतवणूक सुरू राहते.

 

5. Long Term Wealth तयार होऊ शकते

Sip short term profit बरोबरच भविष्यातील मोठ्या goals साठी वापरली जाते. जसे, घर खरेदी, मुलांचे शिक्षण, Retirement, Emergency fund, Car, Future security

सुरुवातीला ₹500, ₹1000 छोटी रक्कम वाटू शकते. पण नियमित गुंतवणूक, वेळ, compounding यामुळे भविष्यात चांगला fund तयार होण्याची शक्यता असते.

SIP चे तोटे –

अनेकदा सोशल मीडियावर किंवा जाहिरातींमध्ये “SIP मधून लाखो रुपये कमवा”, “फक्त ₹500 मध्ये मोठा फंड तयार करा” अशा गोष्टी दाखवल्या जातात. पण कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तिचे फायदे आणि तोटे दोन्ही समजून घेणे खूप महत्वाचे असते.

SIP ही Long Term investment पद्धत मानली जाते, पण त्यामध्ये काही धोके आणि मर्यादा देखील असतात.

1. Short Term मध्ये नुकसान दिसू शकते

अनेक नवीन investor लोकांना वाटते “SIP सुरू केली म्हणजे लगेच profit दिसेल.” पण असे होत नाही. sip market शी जोडलेली असते. sip मधील पैसे सामान्यत: Equity Mutual Funds, Market related funds मध्ये गुंतवले जातात. म्हणून share market वर गेल्यास investment वाढू शकते. Market खाली आल्यास value कमी दिसू शकते.

Market मध्ये रोज चढ-उतार होत असतात. Short term मध्ये नुकसान दिसू शकते, profit कमी जास्त होऊ शकतो. अनेक नवीन investor market खाली आला की sip बंद करतात, यामुळे long term फायदा मिळण्याची शक्यता कमी होते.

 

2. Guaranteed Return नसतो

अनेक लोक FD, Saving Account यांच्याशी sip ची तुलना करतात. पण दोन्ही वेगळे आहेत. FD मध्ये तुम्हाला बँक आधीच interest rate सांगते, आणि किती return मिळेल हे साधारण माहीत असते. मात्र sip मध्ये return market performance वर अवलंबून असतो, म्हणून काही वर्ष चांगला return मिळू शकतो तर काही काळ कमी return मिळू शकतो.

याचाच अर्थ sip मध्ये निश्चित profit ची गॅरंटी नसते. म्हणून sip करताना धोका समजून घेणे महत्त्वाचे आहे.

 

3. Patience आवश्यक असते

SIP सुरू करताना हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण काही लोक 1 वर्षात मोठा profit  अपेक्षित ठेवतात. पण SIP मध्ये “वेळ” खूप महत्वाचा असतो.

SIP पटकन श्रीमंत होण्यासाठी नसते तर हळूहळू wealth तयार करण्यासाठी असते. सुरुवातीला ग्रोथ कमी वाटू शकते.

समजा, तुम्ही दर महिन्याला ₹1000 invest करत आहात. पहिल्या 1-2 वर्षात मोठा फरक जाणवणार नाही, मात्र दीर्घकालावधीत नियमित गुंतवणूक, चक्रवाढ, Market growth यामुळे फंड वाढण्याची शक्यता असते. sip मधून Wealth तयार होण्यासाठी वेळ लागतो.

यामुळे market खाली आले की भीती वाटणे, sip बंद करणे, पैसे काढणे या गोष्टी पहिल्यांदा गुंतवणूक करणारे लोक करतात पण sip मध्ये patience, discipline, consistency खूप महत्वाची असते.

 

SIP सुरक्षित आहे का?

हा sip बद्दल सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल. अनेक beginner लोक पहिल्यांदाच गुंतवणूक सुरू करत असल्यामुळे त्यांनाही हा प्रश्न sip सुरू करताना पडत असतो, म्हणून sip सुरक्षित आहे का हे समजून घेणे आवश्यक आहे.

सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, sip कोणतीही investment scheme नाही तर mutual fund मध्ये नियमितपणे गुंतवणूक करण्याची एक पद्धत आहे. म्हणून risk sip मध्ये नाही तर mutual fund आणि त्या fund मधील market investment मध्ये असतो. कारण mutual fund चे पैसे share market, bonds, इतर securities मध्ये गुंतवले जातात. Market रोज वर जातो, खाली येतो म्हणून तुमच्या Investment ची value देखील कमी जास्त होऊ शकते.

उदाहरण – समजा तुम्ही दर महिन्याला ₹1000 SIP करत आहात. 6 महिन्यांत तुम्ही 6000 invest केले. पण अचानक Market खाली आले. तर तुमच्या fund ची value ₹5700 किंवा ₹5500 दिसू शकते.

Market मध्ये अल्पकालीन चढउतार सामान्य असतात. आज market खाली असेल, तर भविष्यात तो पुन्हा वाढूही शकतो.

SIP मध्ये Risk कमी कसा होऊ शकतो?

  1. Long Term विचार ठेवा
  2. Trusted Mutual Fund निवडा
  3. Panic होऊ नका

 

SIP सुरू करण्यासाठी काय लागते?

 SIP सुरू करण्यासाठी काय लागते?

आजच्या काळात SIP सुरू करणे खूप सोपे झाले आहे. मात्र SIP सुरू करण्यापूर्वी काही आवश्यक कागदपत्रे आणि basic गोष्टी तयार असणे गरजेचे असते.

  • PAN Card:
    गुंतवणूक सुरू करण्यासाठी PAN Card आवश्यक मानले जाते. Mutual Fund investment आणि KYC verification साठी PAN Card वापरला जातो.
  • Aadhaar Card:
    ओळख आणि पत्ता verify करण्यासाठी Aadhaar Card उपयोगी पडतो. अनेक apps मध्ये Aadhaar वापरून online verification करता येते.
  • Bank Account:
    SIP मध्ये दर महिन्याला पैसे invest करण्यासाठी Bank Account आवश्यक असतो. Investment ची रक्कम तुमच्या Bank Account मधून auto debit केली जाते.
  • Mobile Number:
    OTP verification, account security आणि investment updates मिळण्यासाठी Mobile Number आवश्यक असतो.
  • KYC Complete असणे:
    KYC (Know Your Customer) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. यामुळे तुमची ओळख verify केली जाते आणि सुरक्षितपणे investment सुरू करता येते.

महत्वाचे: आज अनेक Mutual Fund apps वर Video KYC आणि Aadhaar verification मुळे घरबसल्या काही मिनिटांत SIP सुरू करता येऊ शकते.

सल्ला: SIP सुरू करण्यापूर्वी trusted आणि SEBI regulated platform वापरणे अधिक सुरक्षित मानले जाते.

 

SIP मध्ये किती पैसे गुंतवावेत?

Sip किती पैशांपासून सुरू करावी? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण काही लोकांना असे वाटते की sip साठी मोठी रक्कम लागते तर काहींना वाटते फक्त ₹500 invest करून काही फायदा होईल का?”

मात्र sip सुरू करण्यासाठी मोठी रक्कम नाही तर नियमित गुंतवणूक लागते.

sip मध्ये किती पैसे गुंतवायचे हे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे असू शकते, कारण प्रत्येकाची income वेगळी असते, खर्च वेगळे असतात, जबाबदाऱ्या वेगळ्या असतात म्हणून सुरुवातीला प्रत्येक व्यक्तीने आपला महिन्याचा खर्च समजून घेणे आवश्यक आहे.

Beginner लोकांसाठी साधा नियम – पगाराच्या 10% रक्कम SIP मध्ये गुंतवण्याचा विचार केला जातो. जर तुमचा महिन्याचा पगार ₹30,000 असेल, तर ₹3000 च्या आसपास SIP सुरू करणे योग्य राहील. पण हा fixed rule नाही.

पण जर तुमचे उत्पन्न कमी असेल आणि खर्च जास्त असतील तर सुरुवातीला ₹500, ₹1000 पासूनही SIP सुरू करू शकता.

 

SIP कशी सुरू करावी? Step-by-Step Guide

 SIP कशी सुरू करावी? Beginner साठी Step-by-Step Guide

आजच्या काळात SIP सुरू करणे खूप सोपे झाले आहे. मोबाईल वापरून काही मिनिटांतही SIP सुरू करता येऊ शकते.

  • Step 1 — Mutual Fund App निवडा:
    Groww, Zerodha Coin किंवा Paytm Money सारखे trusted platform वापरू शकता.
  • Step 2 — KYC Complete करा:
    PAN Card, Aadhaar Card आणि Bank Account वापरून KYC पूर्ण करा.
  • Step 3 — योग्य Mutual Fund निवडा:
    Beginner असल्यास Index Fund किंवा Large Cap Fund समजून घेऊन निवडू शकता.
  • Step 4 — SIP Amount ठरवा:
    सुरुवातीला ₹500 किंवा ₹1000 सारख्या छोट्या रकमेपासून सुरुवात करू शकता.
  • Step 5 — Auto Debit सुरू करा:
    दर महिन्याला ठराविक तारखेला पैसे आपोआप invest होतील.

महत्वाचे: SIP सुरू करण्यापूर्वी आपल्या income, expenses आणि financial goals समजून घेणे आवश्यक आहे. सुरुवातीला छोटी रक्कम आणि long term विचार ठेवणे beginner लोकांसाठी अधिक योग्य मानले जाते.

FD vs SIP – कोणता पर्याय चांगला?

FD (Fixed Deposit) SIP (Systematic Investment Plan)
 तुलनेने सुरक्षित पर्याय  Market linked investment
 Fixed आणि निश्चित return मिळतो  Return Market वर अवलंबून असतो
 Risk तुलनेने कमी  Market risk असतो
 Long term wealth growth मर्यादित असू शकते  दीर्घकाळात wealth growth ची शक्यता जास्त असू शकते
 Inflation मुळे purchasing power कमी होऊ शकते  Inflation beat करण्याची शक्यता असू शकते
 Short-term savings साठी योग्य  Long-term goals साठी उपयुक्त
 Stable आणि predictable option  Patience आणि long-term mindset आवश्यक

सोप्या भाषेत समजून घ्या:

जर तुम्हाला कमी risk आणि निश्चित return हवा असेल, तर FD हा पर्याय अधिक योग्य वाटू शकतो.
पण जर तुम्ही दीर्घकाळासाठी wealth तयार करण्याचा विचार करत असाल आणि market risk समजून घेण्याची तयारी असेल, तर SIP हा पर्याय अनेक लोक निवडतात.

 

Beginner लोकांच्या सामान्य चुका

काही लोक SIP बद्दल माहिती मिळाल्यानंतर लगेच गुंतवणूक करतात, पण SIP सुरू करण्याआधी काही सामान्य चुका होऊ शकतात. त्या जाणून घेणे विशेषत: पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांनी या चुका आधीपासून समजून घेणे आवश्यक आहे.

1. दुसऱ्यांना पाहून SIP सुरू करणे

SIP सुरू करणाऱ्या लोकांची ही सर्वात सामान्य चुक असते. अनेक जण सोशल मीडिया, मित्र यांच्याकडून माहिती मिळायल्यानंतर लगेच sip सुरू करतात.

प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी असते, त्यानुसार जबाबदारी, खर्च, Risk घेण्याची क्षमता वेगळी असते, म्हणून दुसऱ्याची पद्धत तुमच्यासाठी योग्य असेलच असे नाही.

 

2. Short Term मध्ये मोठा Profit अपेक्षित ठेवणे

चुकीच्या मार्गदर्शनामुळे अनेकांना असे वाटते की 2-3 महिन्यांत मोठा फायदा होईल. Sip short-term trading नाही, तर नियमित आणि दीर्घकालीन गुंतवणुकीची पद्धत आहे.

 

3. Market खाली गेल्यावर SIP बंद करणे

नवशिके गुंतवणूकदार ही खूप मोठी आणि सामान्य चूक करतात. जेव्हा market खाली येते, तेव्हा investment value कमी दिसते, हे पाहून अनेक नवशिके गुंतवणूकदार घाबरतात, sip बंद करतात, पैसे काढून घेतात.

Share market वर-खाली होत असल्यामुळे short term मध्ये नुकसान दिसू शकते, पण दीर्घकाळात market recover होण्याची शक्यता असते.

 

4. Emergency Fund नसताना गुंतवणूक सुरू करणे

नवीन investor sip सुरू करण्याचा विचार करतात, पण Emergency Fund कडे दुर्लक्ष करतात. खास करून नवशिक्या लोकांनी Emergency Fund आधी तयार करावा, त्यानंतर sip व इतर गुंतवणुकीवर भर द्यावा.

कारण अचानक Emergency आली आणि तुमच्याकडे बचत नसेल, तर अशा वेळी तुम्हाला sip बंद करावी लागू शकते.

 

निष्कर्ष

SIP मध्ये दर महिन्याला थोडी-थोडी एक्कम गुंतवून भविष्यासाठी बचत करण्याची एक सोपी पद्धत आहे.

Market मध्ये चढ-उतार होत असले तरी दीर्घकाळासाठी नियमित SIP केल्यास भविष्यात चांगला fund तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे SIP सुरू करताना संयम आणि सातत्य ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

जर तुम्ही नवशिके असाल आणि गुंतवणूक सुरू करण्याचा विचार करत असाल, तर SIP हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

 

People Also Ask (FAQ)

1. SIP मध्ये पैसे बुडू शकतात का?

Short term मध्ये value कमी होऊ शकते, पण चांगल्या fund मध्ये long term गुंतवणूक केल्यास risk कमी होऊ शकतो.

 

2. SIP किती वर्षे करावी?

साधारणपणे 5 ते 10 वर्षे किंवा त्याहून जास्त कालावधी चांगला मानला जातो.

 

3. SIP बंद केल्यास penalty लागते का?

बहुतेक SIP मध्ये penalty नसते, पण काही funds मध्ये exit load असू शकतो.

 

4. SIP आणि Mutual Fund मध्ये फरक काय?

Mutual Fund हा investment product आहे, तर SIP ही त्यामध्ये गुंतवणूक करण्याची पद्धत आहे.

 

5. SIP मध्ये दर महिन्याला पैसे भरावे लागतात का?

हो, SIP मध्ये ठराविक interval नुसार पैसे invest केले जातात.

 

 

Leave a Comment