आजच्या डिजिटल युगात UPI (Unified Payments Interface) मुळे पैसे पाठवणे आणि घेणे खूप सोपे झाले आहे. UPI हा सर्वात सोपा आणि सुरक्षित पेमेंट करण्याचा मार्ग आहे. पण UPI वापरताना सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे UPI PIN. UPI PIN वापरून व्यवहार करत असताना खूप काळजीपूर्वक करावा लागतो. कारण चुकूनही तुम्ही PIN विसरला तर काय करावे हा प्रश्न पडतो.

तुम्ही एकदा का UPI APP घेऊन UPI PIN सेट केला, पण अचानक तुम्ही PIN विसरला तर काय करावे हा प्रश्न पडतो. पुन्हा नवीन PIN कसा सेट करायचा हे ही समजत नाही. PIN शिवाय तुम्ही पैसे पाठवू किंवा घेऊ शकत नाही. त्यामुळे UPI PIN कसा Set, Change आणि Reset करावा? हे माहिती असणे फार महत्त्वाचे आहे. या लेखात आपण अगदी सोप्या भाषेत सर्व काही समजून घेणार आहोत.
UPI PIN म्हणजे काय?
तुम्ही व्यवहार करताना UPI चा वापर करत असाल, तर तुम्हाला माहितीच असेल की, UPI PIN मध्ये 4 किंवा 6 अंकांचा समावेश असतो. हा 4 किंवा 6 अंकी गुप्त पासवर्ड जो तुम्ही transaction करताना वापरतात. प्रत्येक व्यवहार करताना हा PIN टाकावा लागतो. UPI PIN तुमच्या बँक खात्याशी जोडलेला असतो. या PIN शिवाय UPI व्यवहार होऊ शकत नाही. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर UPI PIN हा तुमच्या बँक खात्याचा सुरक्षा कोड असतो, जो तुमच्या व्यतिरिक्त कोणालाही माहीत नसतो.
UPI (Unified Payments Interface) ही एक डिजिटल पेमेंट प्रणाली आहे, जी National Payments Corporation of India ने तयार केली आहे. तुम्ही पैसे पाठवताना UPI चा वापर करत असाल, तर तुम्हांला अकाऊंट नंबर टाळण्याची गरज पडत नाही, IFSC code लक्षात ठेवावा लागत नाही व कोणतीही Net Banking Details वापरावी लागत नाही, फक्त तुमच्या मोबाईलवरून काही सेकंदात पैसे पाठवता येतात.
UPI PIN का महत्त्वाचा आहे?
UPI वापरताना PIN हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. तो तुमच्या व्यवहारांना सुरक्षित ठेवण्याचे काम करतो आणि खात्री करतो की फक्त तुम्हीच पैसे पाठवू शकता. PIN हा तुमच्या पैशांचा लॉक आहे, जो तुमच्या शिवाय कोणीही वापरू शकत नाही.
1. तुमचे पैसे सुरक्षित ठेवतो –
UPI PIN हे तुमच्या व्यवहारासाठी सुरक्षा कवच आहे. जेव्हा तुम्ही पैसे पाठवता किंवा घेता, तेव्हा APP तुमच्याकडून PIN विचारते. योग्य PIN असल्याशिवाय व्यवहार पूर्ण होत नाही. अशा प्रकारे तुमच्या बँक खात्यातील पैसे सुरक्षित ठेवण्याचे काम UPI PIN करते.
उदाहरण – तुमचा मोबाईल कोणाच्या हातात गेला तरी त्या व्यक्तीला तुमचा UPI PIN माहीत नसल्यामुळे तो पैसे पाठवू शकत नाही.
2. प्रत्येक व्यवहार (Transaction) verify करतो
जेव्हा तुम्ही UPI चा वापर करून पैसे पाठवता, त्याआधी तुम्ही अमाऊंट टाकता, मग तुम्हाला PIN टाकायला सांगितले जाते. हा PIN टाकल्यावरच transaction पुर्ण होतो, म्हणजे PIN टाकल्याशिवाय पैसे जातच नाहीत.
3. कोणालाही तुमच्या खात्यातून पैसे काढता येत नाहीत
जरी कोणाला तुमचा मोबाईल नंबर किंवा UPI ID माहित असले, तरीही तो तुमच्या खात्यातून पैसे काढू शकत नाही, कारण UPI PIN फक्त तुम्हालाच माहित असतो. जर कोणी चुकीने किंवा फसवणुकीने पैसे काढण्याचा प्रयत्न जरी केला, तरी PIN नसल्यामुळे तो यशस्वी होणार नाही.
4. तुमच्या खात्यावर पुर्ण नियंत्रण राहते.
UPI वापरण्यासाठी तुम्हांला 4 किंवा 6 अंकी UPI PIN सेट करावा लागतो. हा PIN प्रत्येक transaction वेळी टाकावा लागतो. PIN टाकल्याशिवाय transaction पूर्ण होणार नाही. हा PIN फक्त तुम्हालाच माहीत असल्यामुळे तुमच्या खात्यावर तुमचेच नियंत्रण राहते.
5. online payments सुरक्षित बनवतो
Online payment पद्धत खूप सोपी आणि सोईस्कर असल्यामुळे आज प्रत्येकजण या पद्धतीचा वापर करताना दिसतो. Shopping, bill payment किंवा recharge करताना UPI PIN चा वापर करून तुम्ही तुमचे पेमेंट सुरक्षित करतात.
6. जलद आणि सुरक्षित व्यवहार शक्य करतो
इतर पेमेंट पध्दतीपेक्षा PIN द्वारे तुम्ही काही सेकंदात transaction complete करू शकतात, ही प्रक्रिया जलद तर होतेच आणि त्याच बरोबर सुरक्षा देखील मिळते.
7. बँक खाते सुरक्षित ठेवतो
UPI PIN थेट तुमच्या बँक खात्याशी जोडलेला असतो, म्हणजेच UPI PIN तुमच्या बँक खात्याचा सुरक्षा दरवाजा आहे. UPI PIN शिवाय कोणतेही व्यवहार होऊच शकणार नाही, त्यामुळे तुमचे खाते सुरक्षित राहते.
8. फसवणूक टाळतो
आजकाल ऑनलाइन फसवणूक खूप वाढत आहे. फेक लिंक किंवा कॉल करून पैसे चोरले जातात. पण UPI PIN शिवाय कोणीही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकत नाही.
UPI ID आणि UPI PIN मधील फरक –
बऱ्याच लोकांना UPI ID आणि UPI PIN यातील फरक समजत नाही, पण हे दोन्ही वेगवेगळे आहेत. UPI ID च्या माध्यमातून लोक तुम्हाला पैसे पाठवतात, तर PIN च्या माध्यमातून तुम्ही लोकांना पैसे देता. म्हणजेच ID हा तुमचा पेमेंट घेण्यासाठी वापरला जाणारा पत्ता असतो, तर PIN हा पैसे पाठवताना वापरला जाणारा गुप्त पासवर्ड असतो, त्यामुळे हे दोन्ही वेगवेगळे असतात. खाली दिलेल्या तक्त्याच्या माध्यमातून सविस्तर फरक समजून घेऊ.
| मुद्दा | UPI ID | UPI PIN |
|---|---|---|
| अर्थ | पेमेंट पत्ता | गुप्त पासवर्ड |
| वापर | पैसे मिळवण्यासाठी | पैसे पाठवण्यासाठी |
| उदाहरण | yourname@bank | 4 किंवा 6 अंकी PIN |
| सुरक्षा | share करू शकता | कधीही share करू नका |
| गरज | पैसे receive करण्यासाठी | transaction complete करण्यासाठी |
UPI PIN कसा सेट करावा?
जर तुम्ही पहिल्यांदाच UPI वापरत असाल, तर PIN सेट करणे आवश्यक आहे.
Step-by-Step प्रक्रिया:
Step 1: सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये Google Pay, PhonePe किंवा Paytm यापैकी कोणतेही एक अॅप उघडा.
Step 2: अॅपमध्ये Bank Account जोडा.
Step 3: बँक खाते जोडताना तुम्हाला तुमच्या ATM (Debit Card) ची माहिती टाका.
Step 4: माहिती टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP (one-time password) येईल. तो OTP टाकून तुमचा नंबर verify करा.
Step 5: Verification पूर्ण झाल्यावर तुम्हाला नवीन UPI PIN तयार करण्याचा पर्याय दिसेल.
आता तुम्ही तुमच्या लक्षात राहील असा 4 किंवा 6 अंकी PIN टाका.
Step 6: तुम्ही टाकलेला 4 किंवा 6 अंकी PIN पुन्हा एकदा Confirm करा.
एवढे केल्यावर तुमचा UPI PIN तयार होईल आणि तुम्ही UPI वापरायला सुरुवात करू शकता.
“UPI PIN तयार करणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे,पण त्या आधी UPI कसे वापरावे याचे स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन जाणून घेणे अधिक उपयुक्त ठरते”
👉”UPI कसे वापरावे याचे स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन“
UPI PIN कसा बदलावा? (Change PIN)
जर तुम्हाला security साठी PIN बदलायचा असेल, तर ह्या स्टेप्स फॉलो करा. तसेच खालील मोबाईल स्क्रीनशॉट ही दिलेला आहे ज्याने तुम्हाला तुमचा UPI पिन change करायचा असेल तर ह्या स्टेप वापरुन सोपे होईल .
Step-by-Step:
Step 1: UPI App उघडा
Step 2: Profile / Bank Account section मध्ये जा
Step 3: “Change UPI PIN” निवडा
Step 4: जुना (सध्याचा) PIN टाका
Step 5: नवीन PIN टाका
Step 6: Confirm करा

UPI PIN Reset करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
⚠️ UPI PIN Reset करताना लक्षात ठेवा
- तुमच्याकडे Debit Card असणे आवश्यक आहे
- Bank registered mobile number active असावा
- OTP साठी network / internet चालू असावे
- चुकीचा PIN वारंवार टाकल्यास account block होऊ शकतो
- Debit card details (expiry date) योग्य टाका
- UPI app update केलेला असावा
- Public Wi-Fi वापरून PIN reset करू नका
- Unknown link किंवा call वरून PIN reset करू नका
- Reset नंतर एक छोटा transaction करून check करा
UPI PIN विसरलात? (Reset PIN)
हा सर्वात common problem आहे, पण जर तुम्ही चुकून पिन विसरला तर खाली मोबाईल स्क्रीनशॉट दिलेला आहे ज्याने तुम्हाला ह्या स्टेप वापरुन पुन्हा नवीन PIN सेट करता येईल.
Step-by-Step Reset प्रक्रिया:
Step 1: UPI App उघडा
Step 2: Profile किंवा Bank Account section मध्ये जा
Step 3: “Forgot UPI PIN” किंवा “Reset PIN” पर्याय निवडा
Step 4: तुमच्या Debit Card चे last 6 digits टाका
Step 5: Expiry date टाका
Step 6: OTP verify करा
Step 7: नवीन PIN सेट करा

UPI PIN सुरक्षित ठेवण्यासाठी टिप्स
🔐 UPI PIN सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
- तुमचा UPI PIN मोबाईलमध्ये कुठेही save करू नका
- Screen sharing करताना PIN टाकू नका
- OTP आणि UPI PIN मध्ये गोंधळ करू नका
- फक्त trusted UPI apps वापरा (Google Pay, PhonePe, Paytm)
- UPI app ला lock (Fingerprint / PIN) लावा
- मोबाईल हरवला तर लगेच SIM block करा
- SMS alerts चालू ठेवा (transaction माहिती मिळेल)
- Regular bank statement check करा
- Public Wi-Fi वर transaction टाळा
- Unknown call किंवा link वरून PIN कधीही share करू नका
⚠️ लक्षात ठेवा: UPI PIN = तुमच्या पैशांची चावी आहे, तो नेहमी गुप्त ठेवा!
निष्कर्ष
UPI PIN हा तुमच्या डिजिटल transactions चा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तो योग्य प्रकारे सेट करणे, वेळोवेळी बदलणे आणि सुरक्षित ठेवणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही वर दिलेल्या स्टेप फॉलो केल्या, तर तुम्ही सहजपणे UPI PIN set करू शकता, change करू शकता आणि जर कधी हा PIN चुकूनही विसरल्यास, तर पुन्हा reset करू शकता. UPI PIN हा तुमच्या बँक खात्याचा एक गुप्त पासवर्ड असतो, जो प्रत्येक व्यवहार सुरक्षित करण्यासाठी वापरला जातो, म्हणून UPI PIN चा काळजीपूर्वक वापर करणे खूप महत्त्वाचे आहे.
FAQ
1. UPI PIN किती अंकी असतो?
UPI PIN साधारणपणे 4 किंवा 6 अंकी असतो.
2. UPI PIN आणि ATM PIN सारखे असतात का?
नाही, दोन्ही वेगळे असतात.
3. UPI PIN विसरलो तर काय करावे?
“Forgot PIN” option वापरून नवीन PIN सेट करा.
4, Debit Card नसल्यास PIN सेट करता येतो का?
नाही, PIN reset साठी debit card आवश्यक आहे.
5. UPI PIN सुरक्षित आहे का?
हो, UPI system खूप सुरक्षित आहे.
6. किती वेळा चुकीचा PIN टाकू शकतो?
मर्यादित वेळा (3-5 attempts), त्यानंतर account block होऊ शकतो.
7. UPI PIN share करणे सुरक्षित आहे का?
अजिबात नाही.