आजच्या डिजिटल युगात पैसे व्यवहार करणे खूप सोपे झाले आहे. पैसे पाठवणे, बिल भरणे किंवा ऑनलाईन खरेदी करणे हे सर्व व्यवहार आपण मोबाईलच्या एका क्लिकवर करू शकतो. पूर्वी बँकेत जाऊन तासनतास उभे राहून हे व्यवहार करावे लागत, पण आता मोबाइलवर काही सेकंदात व्यवहार पूर्ण होतो. यामध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धत म्हणजे UPI.
UPI ही अशी सुविधा आहे जी तुमचे बँक खाते थेट मोबाईल अॅपशी जोडते आणि तुम्हाला 24×7 पैसे पाठवण्याची व घेण्याची सुविधा देते. पण जर तुम्ही अजून UPI वापरले नसेल, वापरायला सुरुवातही केली नसेल किंवा तुम्हाला ते नीट समजत नसेल, तर आज आपण या लेखात UPI कसे वापरावे? नवशिक्यांनी UPI वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल माहिती घेऊ, कारण नवशिक्यांसाठी हे थोडे गुंतागुंतीचे वाटू शकते, पण प्रत्यक्षात UPI वापरणे खूप सोपे आहे. आजच्या डिजिटल युगात तुम्हालाही डिजिटल व्हावे लागेल तेव्हाच तुम्ही या डिजिटल युगात वावरू शकता.

UPI म्हणजे काय?
UPI (Unified Payments Interface) ही एक डिजिटल पेमेंट सिस्टम आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही थेट तुमच्या बँक खात्यातून पैसे पाठवू किंवा घेऊ शकता. थोडक्यात UPI म्हणजे मोबाईल वापरून क्षणात पैसे ट्रान्सफर करण्याची सोपी पद्धत. परंतु UPI फक्त पैसे देवाणघेवाण करणारी यंत्रणा नाही तर एक पूर्ण digital payment ecosystem आहे.
या digital payment ecosystem मध्ये तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करू शकता, दुकानात QR code scan करून payment करू शकता, तुम्ही घरबसल्या वीज बिल, मोबाईल रीचार्ज करू शकता तसेच बँकेत न जाता खात्यातील पैसे चेक करू शकता.
जेव्हा तुम्ही UPI वापरून पैसे पाठवता, तेव्हा तुमची बँक आणि समोरच्या व्यक्तीची बँक काही सेकंदात एकमेकांशी संपर्क साधून व्यवहार पूर्ण करतात.
UPI ही फक्त पैसे पाठवण्याची सुविधा नाही, तर ती आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेली एक डिजिटल क्रांती आहे. योग्य वापर केल्यास ती आपले वेळ, श्रम आणि पैसा वाचवते.”
UPI कसे काम करते?
UPI म्हणजे एक रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे जी तुमच्या बँक खात्याला मोबाईल अॅपशी जोडते आणि काही सेकंदात पैसे पाठवणे किंवा घेणे शक्य करते. हे सिस्टम NPCI (National Payments Corporation of India) ने तयार केले असून ते IMPS (Immediate Payment Service) वर आधारित आहे.
UPI कसे काम करते हे समजून घेण्यासाठी आपण एक सोपे उदाहरण पाहूया, समजा तुम्हाला तुमच्या मित्राला ₹500 पाठवायचे आहेत. त्याला त्वरित पैसे हवे आहेत अशा वेळी तुम्ही सर्वात सोपा मार्ग म्हणजे UPI चा वापर कराल. तुम्ही मोबाईलमध्ये UPI App उघडता आणि तुमच्या मित्राला काही सेकंदात पैसे पाठवतात. पण त्या काही सेकंदांमध्ये पैसे कसे काय गेले याचा विचार आपण करत नाही, नेमकं काय होतं? चला तर मग आज समजून घेऊया.
1 तुम्ही Payment request करता –
जेव्हा तुम्ही UPI App मध्ये मोबाईल नंबर/UPI ID टाकता व रक्कम लिहिता तेव्हा तुमचे App एक payment request तयार करते. ती कशी तर आपण घेतलेल्या उदाहरणावरून समजून घ्या
मी राजेश(मित्र) या व्यक्तीला ₹500 पाठवणार आहे असा message system ला पाठवला जातो.
2 UPI system (NPCI) मध्ये request जाते –
तुम्ही तुमच्या मित्राला पेमेन्ट पाठवण्यासाठी जी payment request तयार होते ही request थेट तुमच्या बँकेत जात नाही. तर ती आधी National Payment Corporation of India (NPCI) कडे जाते.
NPCI कडे request गेल्यावर NPCI तुमची बँक आणि तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर करणार आहात त्या व्यक्तीची बँक ओळखते व दोन्ही बँकांना जोडते. अशा प्रकारे NPCI मध्यस्थीचे काम करते.
3 UPI PIN verify केला जातो –
NPCI दोन्ही व्यक्तीच्या बँक एकमेकांना जोडल्यावर तुम्हांला UPI PIN टाकावा लागतो तेव्हा तुमची बँक चेक करते.
PIN बरोबर आहे का?
तुमच्या खात्यात पैसे आहेत का?
जर सर्व ठीक असेल तर पुढची स्टेप होते.
4 पैसे ट्रान्सफर होतात –
तुम्ही UPI वर व्यवहार करण्यासाठी लिंक केलेली बँक, PIN बरोबर असेल व तुम्ही ट्रान्सफर करत असलेली रक्कम जर तुमच्या खात्यात असेल तर सिस्टम तुमच्या बँकेतून ₹500 (deduct) वजा करते व समोरच्या व्यक्तीच्या बँकेत ₹500 add करते. हे सर्व काही सेकंदात होते.
5 Confirmation मिळते –
व्यवहार पूर्ण झाल्यावर तुम्हाला Payment Successful message येतो, समोरच्या व्यक्तीलाही पैसे मिळाल्याचा message येतो.
UPI ही एक smart आणि fast system आहे जी तुमचा मोबाईल, बँक आणि NPCI यांना जोडून काही सेकंदात पैसे व्यवहार पूर्ण करते. त्यामुळेच आज UPI भारतात सर्वात जास्त वापरली जाणारी digital payment पद्धत बनली आहे.

UPI वापरण्यासाठी का आवश्यक आहे?
आजच्या काळात सर्व काही डिजिटल होत आहे. शॉपिंग बिल, पेमेन्ट, तिकीट बुकिंग अशा वेळी UPI ही एक खूप महत्त्वाची आणि आवश्यक सुविधा बनली आहे.
1. पैसे व्यवहार जलद आणि सोपे झाले आहेत –
पूर्वी काही पैशांसंबंधित काम असले तर पहिले बँकेत जावे लागायचे किंवा ATM मधून पैसे काढावे लागायचे यासाठी आपला वेळ आणि मेहनत दोन्ही वाया जात होती. पण आता आपल्या सर्वाना UPI मुळे हा सर्व त्रास कमी झाला आहे. आता काही सेकंदात पैसे पाठवता येतात तसेच हा व्यवहार कुठूनही करता येतो. शहर असो वा ग्रामीण भाग आज सर्वजण UPI चा वापर करून अगदी जलद आणि सोप्या पद्धतीने पैशांचा व्यवहार करत आहे. उदाहरण
2. Cash carry करण्याची गरज नाही –
आज सर्वत्र डिजिटल पेमेन्ट पद्धतीची सुरुवात झाल्यामुळे आपल्याला कोणतीही रोख रक्कम ठेवण्याची गरज पडत नाही. आपल्याकडे रोख रक्कम असणेही चांगले नाही, विशेषत: प्रवासात इतकी मोठी रक्कम ठेवणे म्हणजे मोठे काळजीचेच काम कारण पैसे हरवण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता असू शकते. UPI मुळे तुमचा मोबाईलच तुमचे wallet झाले आहे त्यामुळे तुम्ही रोख ठेवणे टाळू शकतात उदाहरण समजा तुम्ही प्रवास करत आहात आणि तुमच्या जवळ असलेली रोख रक्कम संपली तरी तुम्ही काळजीमुक्त राहतात कारण UPI ने तुम्हाला व्यवहार करता येईल.
3. 24/7 पैसे व्यवहार (कोणत्याही वेळी) –
UPI चे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे दिवसातील 24/7 तास उपलब्ध आहे, पूर्ण 24 तास, 7 दिवस तुम्ही या प्रणालीचा वापर करून पैशांचे व्यवहार करू शकतात याउलट बँक ठराविक वेळेतच चालू असते. काही ठराविक दिवसच बँक आपली सेवा देते अशा वेळी खूप महत्त्वाचे काम असेल तर UPI वापरुन सहज काम होते उदाहरण समजा तुम्हाला रात्री 11 वाजता अचानक मित्राला पैसे पाठवायचे आहेत तुम्ही काही सेकंदात UPI ने लगेच पाठवू शकता.
4. Online payment खूप सोपे झाले –
आजकाल आपण सर्वच कोणतीही खरेदी असो ऑनलाइन पेमेन्ट करून टाकतो. शॉपिंग, रीचार्ज, बिले ह्या सर्वांचे पेमेन्ट ऑनलाइन करणे इतर पर्यायापेक्षा सोपे वाटते. UPI वरून पेमेन्ट करताना कार्ड डिटेल्स टाकण्याची गरज नसते फक्त UPI ID किंवा स्कॅन द्वारे तुम्ही हे पेमेन्ट करू शकता. उदाहरण तुम्ही कोणत्याही शॉपिंग app वरून शॉपिंग करत असाल तर तिथे तुम्हाला “Pay via UPI” हे ऑप्शन उपलब्ध असते हे ऑप्शन सिलेक्ट करा PIN टाका payment done होते.
5. छोट्या व्यवहारासाठी best (Daily use) –
तुम्ही छोट्या व्यवहारासाठी UPI वापरत असाल, तर UPI खूप उपयुक्त आहे. पण इथे मी तुम्हाला एक टीप देऊ इच्छिते, तुम्ही ह्या छोट्या व्यवहाराची नोंद ठेवा जसे, एखादी डायरी किंवा तुमच्या मोबाइल मध्ये नोट्सचा वापर करू शकता. त्याच बरोबर आठवड्याच्या शेवटी UPI वरील payment history चेक करत जा.
6. सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धत –
UPI वरून व्यवहार करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी घेण्याची गरज नसते UPI वरून व्यवहार करताना PIN protection असते, पैशांचा व्यवहार करताना bank to bank असल्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित राहतात.
7. सर्वांसाठी उपयोगी (Beginner Friendly) –
UPI वापरणे सोपे आहे. शिवाय UPI वरून पैशांचा व्यवहार करणे कोणालाही शिकता येते. तरुणांपासून ज्येष्ठापर्यंत सगळेच सहजपणे वापरताना दिसतात. उदाहरणार्थ, आजी-आजोबा, गृहिणी, विद्यार्थी हे सगळे UPI वापरतात.
UPI मुळे पैशांचे व्यवहार जलद, सोपे, सुरक्षित आणि कुठेही करण्यासारखे झाले आहेत. UPI ही फक्त पैशांचा व्यवहार करणारी प्रणाली नाही, तर ती आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनली आहे. भाजी विकत घेण्यापासून ते ऑनलाइन शॉपिंगपर्यंत सर्व ठिकाणी UPI उपयोगी पडते. म्हणूनच, आजच्या काळात UPI वापरणे ही गरज बनली आहे, पर्याय नाही. त्यासाठी तुम्हाला UPI बद्दलची सर्व माहिती उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे, ज्यामुळे तुम्ही UPI व्यवहार सहज करू शकता.

UPI ID कसा तयार करावा? Step-by-Step (2026)
UPI वापरण्यासाठी सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे UPI ID तयार करणे. जर तुम्ही पहिल्यांदाच UPI वापरणार असाल, तर सर्वात आधी तुम्हाला UPI ID तयार करावे लागते. हा ID म्हणजे तुमचा डिजिटल पेमेंटचा ओळख क्रमांक असतो. जसे तुम्ही ईमेल अकाऊंट उघडण्यासाठी एक ईमेल ID तयार करता, तसाच UPI ID तयार करावा लागतो.
UPI ID म्हणजे virtual payment address (VPA). हा एक युनिक ओळख क्रमांक असतो, जो तुमच्या बँक खात्याशी जोडलेला असतो. यामुळे तुम्हाला पैसे पाठवताना किंवा घेताना बँक अकाऊंट नंबर आणि IFSC कोड टाकायची गरज नाही. फक्त UPI ID पुरेसा असतो.
UPI ID तयार करण्यासाठी आवश्यक गोष्टी
- स्मार्टफोन
- इंटरनेट कनेक्शन
- बँक खाते
- मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असणे
- UPI अॅप (Google Pay, Phone Pe, Paytm, BHIM इ.)
- Step-by-Step प्रक्रिया: UPI ID कसा तयार करावा?
Step 1- UPI अॅप डाउनलोड करा
Google Play Store किंवा Apple App Store वरून तुमच्या आवडीचे UPI अॅप डाउनलोड करा.
उदा. Google Pay, Phone Pe, Paytm, BHIM.
Step 2 – मोबाईल नंबर व्हेरिफाय करा
अॅप डाउनलोड केल्यावर अॅपमधील सर्व माहिती भरा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय करण्यासाठी अॅप तुमच्या मोबाईल नंबरवर OTP पाठवून तो व्हेरिफाय करेल. तुमचं मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.
Step 3 – बँक खाते निवडा आणि लिंक करा
अॅप तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असलेली बँक शोधेल. तुमचे खाते निवडा आणि ते अॅपशी लिंक करा.
Step 4 – ATM कार्डची माहिती टाका
ATM कार्डच्या तपशीलांचा वापर करून UPI PIN सेट करा. तुमच्या ATM कार्डचे शेवटचे 6 अंक व expiry date टाका.
Step 5 – UPI PIN सेट करा
4 किंवा 6 अंकी PIN तयार करा. हा खूप महत्त्वाचा आहे, कारण हा PIN प्रत्येक व्यवहारासाठी आवश्यक असतो.
Step 6 – UPI ID तयार होतो
अॅप आपोआप तुमचा UPI ID तयार करते.
तुम्ही हा ID बदलू शकता किंवा स्वतःचा युनिक ID निवडू शकता.
.
UPI वापरून पैसे कसे पाठवावे?
UPI वापरून पैसे पाठवणे खूप सोपे आहे. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
Step 1: UPI App उघडा
तुमच्या मोबाईलमध्ये Google Pay / Phone Pe / Paytm app open करा.

Step 2: “Pay” किंवा “Send Money” निवडा
app मध्ये “Pay” किंवा “Send Money” option वर क्लिक करा

Step 3: UPI ID किंवा मोबाईल नंबर टाका
ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्यांचा मोबाईल नंबर किंवा UPI ID टाका

Step 4: रक्कम (Amount) टाका
किती पैसे पाठवायचे आहेत ते टाका (उदा. ₹500)

Step 5: UPI PIN टाका
तुमचा 4 किंवा 6 अंकी UPI PIN टाका

Step 6: Payment Successful
तुमचा transaction पूर्ण झाला आहे

महत्वाची सूचना:
- UPI PIN कुणालाही सांगू नका
- पैसे घेताना PIN टाकायची गरज नसते
- नेहमी नाव verify करूनच पैसे पाठवा
- फक्त अधिकृत अॅप्स वापरा.
- संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
- व्यवहार झाल्यानंतर SMS किंवा नोटिफिकेशन तपासा.
- फसवणूक झाल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधा.
UPI वापरून पैसे कसे घ्यावे?
मार्ग 1: UPI ID वापरून पैसे मागणे
- अॅपमध्ये “Request Money” किंवा “पैसे मागा” हा पर्याय निवडा.
- ज्याच्याकडून पैसे घ्यायचे आहेत त्याचा UPI ID टाका.
- रक्कम लिहा आणि विनंती पाठवा.
- समोरचा व्यक्ती मंजूर केल्यावर पैसे तुमच्या खात्यात जमा होतील.
मार्ग 2: QR कोड वापरून पैसे घेणे
- तुमच्या अॅपमध्ये “Receive Money” किंवा “My QR Code” हा पर्याय निवडा.
- तुमचा QR कोड समोरच्या व्यक्तीला दाखवा.
- तो व्यक्ती QR कोड स्कॅन करून पैसे पाठवेल.
- व्यवहार पूर्ण झाल्यावर पैसे तुमच्या खात्यात जमा होतील.
मार्ग 3: मोबाईल नंबर वापरून पैसे घेणे
- जर तुमचा मोबाईल नंबर UPI शी लिंक असेल, तर समोरचा व्यक्ती फक्त तुमचा मोबाईल नंबर टाकून पैसे पाठवू शकतो.
- तुम्हाला वेगळा ID सांगण्याची गरज नाही.
पैसे मिळाल्यानंतर काय होते?
- व्यवहार यशस्वी झाल्यावर तुम्हाला अॅपमध्ये नोटिफिकेशन येते.
- बँकेकडून SMS देखील मिळतो.
- पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात — अॅपमध्ये वेगळं वॉलेट नसतं.
सुरक्षिततेसाठी टिप्स
- तुमचा QR कोड फक्त विश्वासार्ह लोकांनाच शेअर करा.
- UPI PIN कधीही कोणाशी शेअर करू नका.
- संशयास्पद कॉल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका.
- व्यवहार झाल्यानंतर नेहमी SMS किंवा नोटिफिकेशन तपासा.
कोणासाठी UPI उपयोगी आहे?
1 विद्यार्थ्यांसाठी (Students) –
विद्यार्थ्यांना रोज छोटे-मोठे खर्च करावे लागतात, जसे नोट्स, बुक्स, खाणे-पिणे, Mobile recharge यासाठी रोख रक्कम ठेवण्यापेक्षा UPI चा वापर करून हा रोजचा खर्च सहज करता येतो.
2 छोट्या दुकानदार आणि व्यापाऱ्यांसाठी (Small shopkeepers and traders) –
छोटे दुकानदार आणि व्यापारी QR code वापरुन ग्राहकांकडून थेट पैशांचा व्यवहार पारदर्शकपणे करतात. QR code च्या वापरामुळे रोख पैशांची हाताळणी कमी होते आणि पैसे लगेच बँक खात्यात जमा होतात.
3 नोकरी करणाऱ्या लोकांसाठी (Working Professionals) –
जॉब करणाऱ्या लोकांना Rent, बिलस्, रोजचं खर्च हे सर्व manage करावे लागते. UPI चा वापर करून वेळ तर वाचतोच, शिवाय कुठूनही पेमेन्ट करता येते.
4 गृहिणींसाठी (Housewives) –
गृहिणीना घर चालवताना रोजचे होणारे खर्च जसे किराणा, भाजी, छोटी खरेदारीसाठी UPI ने व्यवहार करणे योग्य ठरते. UPI मुळे सहज पेमेन्ट करता येते, पैसे रोख ठेवण्याची गरज नाही.
5 ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizens) –
ज्येष्ठ नागरिकांना पैशासंबंधित कामे करण्यासाठी बँकेत जावे लागते. रांगेत उभे राहावे लागते. पण आता त्यांना घरबसल्या UPI द्वारे पेमेन्ट करता येईल. अनेक ज्येष्ठ नागरिक UPI वापरायला शिकले आहेत. ते स्वतःच पेमेन्ट करतात.
6 प्रवास करणाऱ्या लोकांसाठी (Travellers) –
अनेकदा प्रवास करताना पैसे संपून जातात, अशा वेळी बँक व ATM शोधणे अवघड होऊ शकते. मात्र UPI मुळे जगाच्या कुठल्याही कोपऱ्या कुठेही पेमेन्ट करता येते. QR code सर्वत्र उपलब्ध असल्याने UPI सहज वापरता येते.
7 Online shopping करणाऱ्यांसाठी –
आजकाल सगळे online shopping करतात. Online shopping मध्ये सर्वात जास्त पेमेन्ट पर्यायांमध्ये UPI अधिक पसंद केले जाते, कारण UPI मध्ये card details टाकण्याची गरज पडत नाही, तसेच fast payment होते.
8 कुटुंबासाठी (Family Use) –
घरातील सदस्यांना पैशांची गरज असेल, तर या पद्धतीचा वापर करून पैसे ट्रान्सफर करणे सोपे जाते. पैसे लगेच पाठवता येतात. Emergency च्या काळात UPI चा उपयोग होतो.
9 ग्रामीण भागातील लोकांसाठी –
आज मोठ्या प्रमाणात इंटरनेट सेवा ग्रामीण भागातही पसरलेली आहे. मोबाईल आणि इंटरनेट असले की गावतसुध्दा UPI वापरता येते. सरकारी योजना, सबसिडी किंवा पेमेंट्स थेट खात्यात मिळतात.
“UPI वापरताना PIN set करणे, change करणे आणि reset करणे या सर्व गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.
👉“UPI PIN set, change आणि reset कसा करावा”
निष्कर्ष
आजच्या डिजिटल युगात UPI ही केवळ पेमेंट करण्याची पद्धत नसून, ती आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनली आहे. काही सेकंदात पैसे पाठवणे, बिल भरणे किंवा ऑनलाइन व्यवहार करणे आता अत्यंत सोपे झाले आहे. योग्य पद्धतीने आणि सुरक्षिततेची काळजी घेऊन UPI वापरल्यास तुम्ही तुमचे आर्थिक व्यवहार अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर करू शकता. जर तुम्ही अजून UPI वापरायला सुरुवात केली नसेल, तर आजच सुरुवात करा आणि डिजिटल व्यवहारांचा अनुभव घ्या.
FAQ
1. UPI वापरणे सुरक्षित आहे का?
हो, UPI सुरक्षित आहे. पण PIN आणि OTP कुणालाही न दिल्यास ते पुर्णपणे सुरक्षित राहते.
2. UPI वापरण्यासाठी charges लागतात का?
बहुतेक वेळा UPI transactions फ्री असतात.
3. UPI PIN म्हणजे काय?
हा 4 किंवा 6 अंकी कोड असतो, जो व्यवहारासाठी वापरला जातो.
4. इंटरनेट नसल्यास UPI वापरता येते का?
नाही, UPI वापरण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे.
5. चुकीच्या व्यक्तीला पैसे गेले तर काय करावे?
ताबडतोब app मधून complaint करा आणि बँकेशी संपर्क साधा.
6. एकाच मोबाईलवर अनेक UPI ID तयार करता येतात का?
होय!
जर तुमच्याकडे अनेक बँक खाती असतील, तर प्रत्येक खात्यासाठी वेगळा UPI ID तयार करता येतो.